रिअलमीतर्फे (Realme) या ओप्पोच्या उप-ब्रँडकडून आज Realme 3 Pro व Realme C2 असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. या ब्रॅंडला लवकरच भारतात एक वर्ष पूर्ण होणार आहे. नॉचसोबत कमी किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या फोन्समध्ये Realme C2 च्या रूपात आणखी एकाची भर पडली आहे तर Realme 3 Pro मध्ये ड्युड्रॉप डिस्प्ले सोबत VOOC फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. यामध्ये Realme 2 Pro च्या तुलनेत आता सुधारित कॅमेरा, प्रोसेसर व मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
रिअलमी 3 प्रो मुळे शायोमीच्या रेडमी नोट ७ प्रोला नवा स्पर्धक मिळाल्याच बोललं जात आहे. प्रोसेसरबाबतीत कागदावर तरी RealMe 3 Pro चांगला दिसत असला तरी सॉफ्टवेअर व कॅमेरा रेडमी नोट ७ प्रो इतका चांगला नसल्याचं सुरुवातीस आलेल्या रिव्यूमधून दिसून येत आहे.
Realme 3 Pro Specifications:
डिस्प्ले : 6.3-inch FHD+
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 710 AIE
GPU: Adreno 616
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64/128 (Expandable upto 256GB)
बॅटरी : 4045mAh सोबत 5V4A charger VOOC Flash Charge 3.0
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6.0 based on Android 9.0
कॅमेरा : 16MP+5MP Dual Pixel Fast Focusing f/1.7 +f/2.4
फ्रंट कॅमेरा : 25MP f/2.0 AI Beautification HDR
रंग : Lightning Purple, Nitro Blue, Carbon Grey
सेन्सर : E-Compass, Light Sensor, Proximity, Gravity, Accelerometer
इतर : 1080p slow motion 120fps, 960fps slowmo, 2.5D Display, Gorilla Glass 5, Dual Sim + microSD Card Slot, Dewdrop FHD+ Full Screen, Bluetooth 5.0, 3.5mm Audio Jack
किंमत : ₹13,999 (4GB+64GB)
₹16,999 (6GB+64GB)
हा फोन २९ एप्रिल पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.
यासोबत सादर झालेला realme C2 १५ मे पासून फ्लिपकार्टवर विक्रीस उपलब्ध होईल.
Realme C2 Specifications:
डिस्प्ले : 6.1” dewdrop notch HD+
बॅटरी : 4000mAh battery
कॅमेरा : 13MP+2MP dual AI rear camera
किंमत : ₹5,999 (2GB+16GB)
₹7,999 (3GB+32GB)