भारतात वेगाने वाढत असलेले वेब कंटेंटचं मार्केट पाहून काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ यांचा भारतात प्रवेश झाला. आता यामध्ये अनेक भारतीय कंपन्यासुद्धा उतरलेल्या असल्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे आता नेटफ्लिक्स नव्या प्रकारच्या प्लॅन्सद्वारे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नात आहे!
आता नव्याने सादर झालेल्या प्लॅन्सनुसार ग्राहक आठवड्याच्या बिलिंगचा पर्याय निवडू शकतील. हा पर्याय फक्त मोबाइलवर पाहण्यासाठीच उपलब्ध असणार आहे.
- ₹ ६५ दर आठवडा मोबाइल ओन्ली प्लॅन
- ₹ १२५ दर आठवडा Basic Plan (SD)
- ₹ १६५ दर आठवडा Standard Plan (दोन डिव्हाइसेस, HD)
- ₹ २०० दर आठवडा Ultra Plan (चार डिव्हाइसेस, 4K)
- सोबत ₹ २५० दर महिना मोबाइल ओन्ली या प्लॅनचीही चाचणी सुरु आहे
- सोबत एक महिना मोफत ट्रायल उपलब्ध आहेच…
मोबाइल ओन्ली प्लॅन्समध्ये ग्राहक फोन/टॅब्लेट यापैकी केवळ एक डिव्हाईस वापरू शकतील. यामध्ये HD/4K रेजोल्यूशनमध्ये कंटेंट पाहता येणार नाही. तसेच हा प्लॅन सुरु असताना लॅपटॉप/डेस्कटॉपवर नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. हे प्लॅन्स सध्या चाचणी स्वरुपात असल्यामुळे सर्वांना दिसतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.
हे स्वस्त प्लॅन्स आल्यावरसुद्धा नेटफ्लिक्स भारतातील सर्वात महाग स्ट्रिमिंग सेवा आहे. अॅमेझॉनची प्राईम सेवा वस्तूंच्या डिलिव्हरीसोबत चित्रपट, गाणी, मालिका असं सर्वकाही उपलब्ध करून देत असल्यामुळे तो चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेच. आता हॉटस्टार, अल्टबालाजी, Zee5, Voot, Hooq, Sony LIV, Eros Now, यांनीही वेब कंटेंट स्ट्रिमिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे प्रमाण वाढत गेल्यास ग्राहकांना सर्व सेवासाठी वेगवेगळ सबस्क्रिप्शन घेत बसणं जड जाणार आहे हे मात्र नक्की…