मायक्रोसॉफ्टने 1 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवलाचा हा टप्पा काल काही क्षणांसाठी ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी मायक्रोसॉफ्ट जगातली तिसरी कंपनी ठरली आहे! याआधी अॅपल व अॅमेझॉन यांनी हा मोठा पल्ला गाठला होता! ह्या क्षणी हा लेख लिहीत असताना मायक्रोसॉफ्ट जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी आहे!
१ ट्रिलियन डॉलर्स रुपयांमध्ये सांगायचे तर ~६९ लाख कोटी रुपये भागभांडवल! अॅपल व अॅमेझॉनने हा टप्पा आधीच गाठलेला असला तरी त्यांचं सध्याचं मार्केट कॅपिटल खाली आलं आहे. हा लेख लिहीत असताना अॅपलचं 964 बिलियन डॉलर्स, अॅमेझॉनचं 946 बिलियन डॉलर्स तर मायक्रोसॉफ्टचं 994 बिलियन डॉलर्स इतकं मार्केट कॅपिटल आहे. मात्र हे काही दिवसातच अॅपल व अॅमेझॉनचं यांचे क्वार्टरली रिझल्ट्स जाहीर केल्यावर पुन्हा एकदा वर जाऊ शकतील!
CNBC च्या गणितानुसार जर तुम्ही २००९ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये 1000 डॉलर्स गुंतवले असते तर त्याची किंमत आज 8000 डॉलर्स इतकी म्हणजे 700% अधिक झाली असती!
सध्याचे सीईओ सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टमधील सूत्रे स्विकारल्यापासून मायक्रोसॉफ्टने वेगाने भरारी घेतली आहे. नेहमीचं सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळख न राहता क्लाऊड कम्प्यूटिंगमध्येही ते सध्या आघाडीवर आहेत! येणार्या काळात वाढत जाणारी क्लाऊड कम्प्यूटिंगची गरज पाहता मायक्रोसॉफ्टने आधीच योग्य दिशेने पाऊल टाकलं आहे असं म्हटल्यास हरकत नाही. सर्फेस मालिकेतील हार्डवेअर प्रोडक्टससुद्धा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. अलीकडे मायक्रोसॉफ्टने नेहमीची क्षेत्र सोडून इतर ठिकाणीही बरीच गुंतवणूक केलेली पाहायला मिळत आहे. यासोबत आधीची मानसिकता बदलत आता इतर कंपन्यांसोबत काम करण्याची दाखवलेली तयारी त्यांना नक्कीच फायदेशीर ठरत असल्याच दिसून येत आहे!
मायक्रोसॉफ्टची सुरुवात बिल गेट्स यांनी ४ एप्रिल १९७५ मध्ये केली होती. बिल गेट्स व मायक्रोसॉफ्टचा सुरुवातीचा प्रवास आमच्या या लेखामध्ये वाचू शकाल.
search terms : Microsoft third company to cross $1 trillion market cap US nasdaq after Apple and Amazon