सध्या मिररलेस कॅमेरांचं वारं वेगात वाहत असताना कॅननने आपल्या DLSR वरुन लक्ष दूर केलं नसल्याचं दाखवून देत आज DLSR कॅमेरा जाहीर केला आहेत! याचं नाव EOS Rebel SL3/250D असं असणार आहे.
हा कॅमेरा 24.1-megapixel APS-C सेन्सर असलेला आजवरचा सर्वात लहान आणि हलका EOS कॅमेरा ठरला आहे. यामधील सुविधा बर्यापैकी EOS M50 या मिररलेस कॅमेरासारख्याच आहेत. DIGIC 8 processor, 3.0 inch flip-around touchscreen आणि 4K video. EOS मालिकेमधील हा असा पहिलाच कॅमेरा आहे ज्यात Dual Pixel autofocus with eye detection मिळेल (मात्र Live View Mode मध्येच)
Image Sensor : 22.3 mm x 14.9 mm CMOS
Effective Pixels : 24.10 megapixels
प्रोसेसर : DIGIC 8
Lens Mount : EF mount
AF System/ Points : Via optical viewfinder: 9-point Center AF point
Speed : 30-1/4000 sec (1/2 or 1/3 stop increments)
Rebel SL3 / EOS 250D एप्रिल महिन्याच्या अखेरीस खरेदीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत $599.99 (Body) असेल. Body+ EF-S 18-55 f/4-5.6 IS STM ची किंमत $749.99 अशी असेल.