अडोबीच्या फोटोशॉपमधल्या सर्वात भन्नाट सुविधांपैकी एक म्हणजे Content Aware Fill यामुळे आपल्या फोटोमध्ये नको असलेल्या गोष्टी एका क्लिकवर काढून टाकल्या जातात आणि त्याजागी आजूबाजूला असलेल्या गोष्टी समजून घेऊन त्यानुसार रंग दिला जातो. आता ही सोय काही मोबाइल अॅप्समध्येही पाहायला मिळते. तसे पाहायला गेलं तर ही गोष्ट फोटो हा एकेच फ्रेम असूनही अवघड आहे. मात्र अडोबीने फोटोसोबत आता चक्क व्हिडिओलाही कंटेंट अवेयर फिल दिला आहे! अडोबी आफ्टर इफेक्ट्स २०१९ मध्ये ही सोय पाहायला मिळेल!
अडोबीचं आफ्टर इफेक्ट्स हे सॉफ्टवेअर प्रामुख्याने व्हिडिओ एडिटिंग व व्हिडिओ ग्राफिक्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. याच्या २०१९ आवृत्तीमध्ये अडोबीच्या सेन्सई मशीन लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर करून व्हिडिओमध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाकू शकेल! सध्या जर हे करायचं असेल तर तासंतास फ्रेम अन फ्रेम एडिट करत बसावं लागतं मात्र आता नव्या सुविधेमुळे एडिटर मंडळींच काम बरच सोपं होणार आहे!
अडोबीनी त्यांच्या सर्वच उत्पादनांमध्ये एप्रिल २०१९ चं नवं अपडेट जोडून अनेक नव्या सोयी आणल्या आहेत. यामध्ये प्रीमियर प्रो, कॅरक्टर अॅनिमेटर, ऑडीशन, आफ्टर इफेक्ट्स यांचा समावेश आहे!
Adobe चा उच्चार बरेच जण अडोबे असा करतात मात्र याचा खरा उच्चार अडोबी असा आहे! 😃