हल्लीचे इंटरनेट ट्रेंड म्हणजे औंक चॅलेंज तमुक चॅलेंज ज्यामध्ये विचित्र/हिंसक/धोकादायक गोष्टी करणे असंच चित्र समोर येतं. मात्र आता एक नवं ट्रॅशटॅग नावाचं चॅलेंज समोर येत असून याबद्दल मात्र नक्कीच कौतुकाचे दोन शब्द बोलावेसे वाटतील…!
ट्रॅशटॅग चॅलेंज : या चॅलेंजमध्ये आपल्या जवळच्या कचरा साठलेल्या जागेची स्वच्छता करायची, कचऱ्याच्या बॅगा भरून एकत्र करायच्या आणि त्याचा आधी व नंतर असं दोन्ही दृश्य दाखवणारा फोटो काढून सोशल मीडियावर #TrashTag हा हॅशटॅग वापरुन टाकायचा!
याची सुरुवात २०१५ मध्ये ट्रॅशटॅग प्रोजेक्ट या नावाने UCO तर्फे सुरू झाली असल्याच सांगण्यात येतं. ही UCO कंपनी बाहेरच्या कामांसाठी उपयोगी पडतील अशी उपकरणे बनवते. या चॅलेंजद्वारे घराबाहेर पडून स्वच्छता करण्यास प्रोत्साहन देण्याचं त्यांचा हेतु होता. काही कालावधीनंतर ह्याची चर्चा थांबली मात्र आता २०१९ मध्ये #TrashTag द्वारे याबद्दल पुन्हा एकदा अचानक चर्चा सुरू झाली आहे आणि याला मोठा प्रतिसाद सुद्धा लाभत आहे!
भारतात अशा ट्रॅशटॅग साठी नागालँडच्या काही विद्यार्थ्यानी सुरुवात केली आता हळूहळू सगळीकडं प्रसार होताना दिसत आहे. कॉलेज कॅन्टीन याबद्दल काही करण्याची प्रेरणा मिळाल्याच सांगितलं.
महाराष्ट्रातही असे प्रयत्न गडकिल्ल्यांवर पाहायला मिळतात. अनेक पर्यटकांनी सामाजिक भान न बाळगता किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी केलेला कचरा दुर्गप्रेमी आयोजित करून स्वच्छ करत असतात. अर्थात त्याला ट्रॅशटॅगचं नाव नव्हतं पण येत्या काळात या चॅलेंजच्या निमित्ताने का होईना अशा स्वच्छतेसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको…!
ट्रॅशटॅग चॅलेंजमधील सहभागी पाहू शकाल पुढील लिंक्सवर : https://www.instagram.com/explore/tags/trashtag
https://twitter.com/hashtag/trashtag
मोमो चॅलेंज, टाइड पॉड चॅलेंज, प्लॅंक, आईस बकेट चॅलेंज, किकी असे कितीतरी चॅलेंज गेल्या काही महिन्यातच आपण पाहिले आहेत. तात्पुरती गंमत म्हणून हे ठीक असेलही मात्र त्या चॅलेंजेस दरम्यान अनेकांनी टोक गाठलं होतं. मात्र या ट्रॅशटॅग चॅलेंजचा मूळ उद्देश चांगल्या हेतूने पुढे आणला असल्यामुळे याला मोठा प्रतिसाद मिळाल्यास चांगलं कार्य घडेल…