हुवावेने त्यांचे नवे स्मार्टफोन्स P30 व P30 Pro आज सादर केले असून कॅमेराच्या बाबतीत या फोनमध्ये बर्याच नव्या गोष्टी पाहायला मिळतील. यामधील चार कॅमेरे फोनमधील फोटोग्राफीचं एकंदरीत रूप बदलण्यासाठी नवा प्रयत्न असल्याच सांगण्यात येत आहे.
हुवावे P30 Pro मध्ये मुख्य कॅमेरा 40MP असून हा सेन्सर RYYB प्रकारचा असेल यामुळे ISO 40% अधिक लाइटच्या रूपात पुढे नेता येईल. दुसरी लेन्स 20MP ultra wide angle आहे आणि तिसरा कॅमेरा 8MP टेलिफोटो लेन्स असून याच वैशिष्ट्य म्हणजे यात 5x optical व 50x hybrid zoom देण्यात आलं आहे. ज्यामुळे चंद्राचाही फोटो काढता येईल असा दावा हुवावेकडून करण्यात येत आहे. इतर सोयींसह हुवावेने या सुद्धा फोनमध्ये दुसर्या फोन्सना वायरशिवाय चार्ज करण्याची सोय दिलेली आहे!
Huawei P30 Pro Specs
डिस्प्ले : 6.47″ FHD+ 2340*1080 Wide Color Gamut(DCI-P3) OLED 422ppi
प्रोसेसर : HUAWEI Kirin 980 Octa-core
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB/512GB + nanoSD card
कॅमेरा : Leica Quad Cam : 40 MP (Wide Angle, f/1.6,OIS) + 20 MP (Ultra Wide Angle Lens, f/2.2 ) + 8 MP (Telephoto, f/3.4,OIS) HUAWEI Time-of-Flight(TOF)
फ्रंट कॅमेरा : 32 MP, f/2.0 Front Camera
बॅटरी : 4200 mAh HUAWEI SuperCharge(Max 40W)
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 9.1 based on Android 9 Pie
इतर : Type-C USB 3.1 GEN1, Bluetooth 5.0, IP68
सेन्सर्स : Ambient Light, In-Screen Fingerprint, Gyroscope, Compass, Proximity Sensor, Gravity Sensor, Hall Sensor, Infrared Sensor, Colour Temperature Sensor
रंग : Amber Sunrise, Breathing Crystal, Pearl White, Aurora, Black
किंमत : Update भारतीय किंमत जाहीर
Huawei P30 Pro 8GB+128GB : ₹ ७१९९०
Huawei P30 Pro 8GB+256GB : €1,100 (~₹ ८६०००)
Huawei P30: €750 (~₹ ५९०००)
Huawei P30 Lite 4GB+128GB : ₹ १९९९०
Huawei P30 Lite 6GB+128GB : ₹ २२९९०