Spotify ही जगातली सर्वात लोकप्रिय म्युझिक स्ट्रिमिंग सेवा असून आता स्पॉटिफाय मोठी करण्याच्या दृष्टीने इतर देशांमध्येही पाऊल ठेवत आहे! अनेक महीने याबद्दल त्यांचे प्रयत्न सुरू होते. काही महिन्यांपूर्वी २०१९ च्या सुरूवातीस भारतातील उपलब्धतेबाबत त्यांनी माहिती दिली होती.
आत्ता प्लॅन्स/किंमती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
भारतात उपलब्ध भाषांमध्ये इंग्लिश, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली व पंजाबी असे पर्याय देण्यात आले आहेत. मराठी भाषेचा मात्र यामध्ये अद्याप समावेश दिसत नाही!यामध्ये सध्या मराठी गाणी अगदी कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नंतर जोडली जाण्याची शक्यता आहे.
कंपनीला भारतात येण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्याचं सांगण्यात येतं. सध्या भारतात असलेल्या रेकॉर्ड लेबल्ससोबत करार करणं हीच मोठी अडचण त्यांच्यासमोर होती कारण भारतात आधीच बऱ्याच कंपन्यासोबत रेकॉर्डचे करार झालेले आहेत. रेकॉर्ड लेबल्सना या स्पॉटिफायवर आणण्यासाठी त्यांनी तब्बल वर्षभर भारतात ऑफिस उघडून ठेवलं आहे. तरीही मोठी नावं सामील होण्यास लवकर तयार होत नव्हती असा अनुभव आल्याचं सांगण्यात आल आहे. सोनी म्युझिक व युनिव्हर्सल यांच्यासोबत यशस्वी करार झाला असून वॉर्नर सोबत मात्र मोठा वाद झालेला ऐकण्यात येत आहे. कोर्टातर्फे सध्यातरी स्पॉटिफायला परवानगी मिळाली आहे.
Download Spotify on Google Play , App Store
प्लॅन्स व किंमती आता अधिकृतरित्या उपलब्ध झाल्या असून सध्याच्या उपलब्ध पर्यायांना सोडून स्पॉटिफायला ग्राहक वळवणं बहुधा अवघडच जाईल. जिओ सावन, गाणा, हंगामा, Wync, अॅमेझॉन प्राईम म्युझिक, अॅपल म्युझिक, इ पर्याय भारतीयांना आधीच उपलब्ध आहेत ते सुद्धा अतिशय स्वस्तात…आधीच आपल्याकडे गाण्यांसाठी पैसे मोजण्याची मानसिकता नसते.
स्पॉटिफाय प्लॅन्स खालीलप्रमाणे
एक महिना मोफत ट्रायल त्यानंतर ११९ दरमहा
₹ १३ : १ दिवस
₹ ३९ : ७ दिवस
₹ १२९ : १ महिना
₹ ३८९ : ३ महिने
₹ ७१९ : ६ महिने
₹ ११८९ : वार्षिक
पूर्ण मोफत प्लॅन उपलब्ध : यामध्ये जाहिरातींचा समावेश
विद्यार्थ्यांसाठी ५०% सूट