सोनी कंपनीने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये Xperia 1, Xperia 10 व Xperia 10 Plus असे तीन स्मार्टफोन्स सादर केले असून यामधील Xperia 1 हा त्यांचा फ्लॅगशिप फोन असेल. या फोन मध्ये बर्याच गोष्टी जगत सर्वप्रथम जोडण्यात आलेल्या आहेत. 21:9 CinemaWide 4K HDR OLED, तीन लेन्स असलेला कॅमेरा ज्यामध्ये Eye AutoFocus चा समावेश, CineAlta चे सिनेमा मोड, Dolby Atmos साऊंड,इ सुविधा एक्सपिरीया 1 मध्ये पाहायला मिळतील! 21:9 अस्पेक्ट रेशोमुळे जवळपास सर्वच चित्रपट मूळ स्वरुपात पूर्णस्क्रीनवर सहज पाहता येतील!
गेली काही वर्षं फोन्सच्या मार्केटमधून सोनी मागे पडत चालली आहे. काही ट्रेंड्समध्ये उशिरा सहभागी होणं, ग्राहकांच्या मागणीनुसार सोयी न पुरवणं, अवाजवी किंमत अशा गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतील. Xperia च्या नाव देण्याची पद्धत न समजण्याइतकी विचित्र आहे. आता सुद्धा सध्याच्या फोन्सच्या मानाने फारच कमी बॅटरी असलेला हा फोन एकदम उभ्या डिझाईनमध्ये बनवण्यात आला आहे. याला आता कितपत प्रतिसाद मिळेल तो नंतर कळेलच…
Sony Xperia 1 Specs :
डिस्प्ले : 6.5″ 4K HDR OLED (1644×3840) 21:9 CinemaWide
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
रॅम : 6GB RAM (LPDDR4X)
स्टोरेज : 128GB + MicroSD slot (up to 512GB)
कॅमेरा : Triple Camera 12MP F1.6 + 12MP F2.4+ 12MP F2.4 Super wide-angle, 2x optical zoom
फ्रंट कॅमेरा : 8MP HDR photo SteadyShot
बॅटरी : 3330 mAh USB Power Delivery (USB PD) fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ (2.4/5GHz) Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB Type-C, Water resistant (IP65/68), Corning Gorilla Glass 6, Dolby Atmos Stereo speaker.
सेन्सर्स : Accelerometer, Ambient light sensor, Barometer sensor, eCompassTM, Fingerprint sensor, Game rotation vector, Geomagnetic rotation vector, Gyroscope, Hall sensor, Proximity sensor, RGBC-IR sensor
किंमत : अद्याप जाहीर केलेली नाही