कार्यालयीन कामाच्या नियोजनासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या ‘स्लॅक’ या सेवेचा तब्बल १ कोटी यूजर्सकडून रोज वापर केला आहे! स्लॅक आता कंपनीमधील कर्मचार्यांच्या कामासंबंधित चर्चेसाठी उत्तम साधन बनलं आहे.
स्लॅकची २०१५ पासून नेहमीच वाढ होत राहिली आहे. लाखो युजर्सची यामध्ये रोज भर पडत असून वापरण्यास सोपी आणि सुटसुटीत रचना यामुळे कंपनी, कर्मचारी यांचा स्लॅक वापरण्याकडे ओढा दिसून येत आहे. कंपनीने नुकताच (गरज नसताना) नवा लोगोसुद्धा सादर केला आहे!
स्लॅकची सुरुवात स्टेवर्ट बटरफिल्ड यांनी त्यांच्या Tiny Speck या गेम कंपनीच्या अंतर्गत कामासाठी केली होती. होय हा एका कंपनीचा अंतर्गत प्रकल्प आता सॉफ्टवेअरच्या रूपात जगभर वापरला जातोय! Slack हे नाव Searchable Log of All Conversation and Knowledge चं संक्षिप्त रूप आहे!
तरीही सध्या स्लॅक एकत्रितपणे कामासाठी वापरल्या जाणार्या चॅट सेवांमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे! पहिल्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचं स्काईप (Skype) फॉर बिझनेस आणि दुसर्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचच टीम्स (Microsoft Teams) आहे. एकूण मार्केटचा ४४ टक्के हिस्सा स्काईप, २१ टक्के मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्लॅक कडे १५ टक्के असा विभागला गेला आहे!