काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने भारतातल मध्यम किंमतीच्या फोन्सचं गमावलेल मार्केट पुन्हा मिळवण्यासाठी M मालिकेतील फोन्सची घोषणा केली होती. मोठ्या प्रमाणात जाहिराती वगैरे करून M10, M20 हे ठीक ठाक फोन १०,००० हून कमी किंमतीत सादर केले होते. मात्र आता १५००० च्या दरम्यान किंमती असलेल्या फोनमध्ये नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या एक ग्राहकवर्ग असा असतो जो शायोमी, विवो, ओप्पो सारख्या ब्रँड्सच्या फोन्सची अजिबात निवड करत नाहीत. त्यांना M30 उत्तम पर्याय होऊ शकेल. हा फोन ७ मार्चपासून अॅमेझॉनवर उपलब्ध होईल.
या Sasmung Galaxy M30 मध्ये 6.38″ SuperAMOLED डिस्प्ले, तीन लेन्स असलेले कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी व फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये अँड्रॉइड 8.1 ओरिओ ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळेल ज्यावर Samsung 9.5 UI जोडलेला असेल.
Samsung Galaxy M30 Specs
डिस्प्ले : 6.4″ Super AMOLED FHD+ Infinity U Display
प्रोसेसर : Exynos 7904 Octa Core Processor
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB/128GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 13MP + 5MP + 5MP Ultra Wide Triple Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0
बॅटरी : 5000 mAh 15W Type-C fast charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Samsung Experience UI 9.5 with Android 8.1
इतर : Type-C, Widevine L1 Certification, Dolby ATMOS
सेन्सर्स : Fingerprint Scannner, Face Unlock, Accelerometer, Gyro sensor, Proximity Sensor, Virtual Light Sensing
रंग : Gradation Blue, Gradation Black
किंमत :
१४९९० (4GB+64GB)
१७९९० (6GB+128GB)
Samsung Galaxy M30 on Amazon : https://amzn.to/2NyPTRk