सॅमसंगच्या गॅलक्सी मालिकेमधील नवे फोन्स आज सादर झाले असून सॅमसंगने Galaxy S10 चक्क चार मॉडेलमध्ये उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं आहे! हे मॉडेल्स Samsung Galaxy S10, S10e, S10+ व S10 5G अशा प्रकारे वर्गीकरण केलेले असतील आणि ग्राहकांच्या गरजेनुसार यांची खरेदी करता येईल! नव्या गॅलक्सी S10 फोन्समध्ये नवा अधिक चांगला डिस्प्ले फ्रंट कॅमेरासाठी ग्लास पॅनलमध्ये लेझर कटआऊट, अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर जो डिस्प्ले खालीच असेल, सुधारित AI कॅमेरा अशा भन्नाट सुविधा देण्यात आल्या आहेत!
यासोबत गॅलक्सी अनपॅक्ड २०१९ मध्ये गॅलक्सी फोल्ड स्मार्टफोन, गॅलक्सी बड्स इयरबड्स, गॅलक्सी फिट आणि गॅलक्सी वॉच अॅक्टिव्ह हे स्मार्टवॉच सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे!
या फोनचं नावीन्य प्रामुख्याने यामध्ये असलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरला म्हणता येईल कारण हा डिस्प्ले खालीच असून हा जगातला पहिलाच अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर असून हा वनप्लस 6T प्रमाणे ऑप्टिकल नसून अल्ट्रासॉनिक वेव्हजद्वारे बोट स्कॅन करून लगेच स्क्रीन अनलॉक केली जाते! हे ऑप्टिकल इन डिस्प्ले स्कॅनर्सपेक्षा वेगवान आणि सुरक्षित असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे! S10 ची एक आवृत्ती 5G आधारित असणार आहे!
यामध्ये असलेल्या Galaxy PowerShare तंत्राद्वारे तुमचं गॅलक्सी स्मार्टवॉच, गॅलक्सी इयरबड्स सुद्धा फोनद्वारेच चार्ज करता येतील ते सुद्धा वायरशिवाय!
Samsung Galaxy S10 Plus Specs :
डिस्प्ले : 6.4-inch Quad HD+ Curved Dynamic AMOLED, 19:9 (522ppi)
प्रोसेसर : 7nm 64-bit Octa-core processor
रॅम : 8GB/12GB RAM (LPDDR4X)
स्टोरेज : 128GB/512GB/1TB + MicroSD slot (up to 512GB)
कॅमेरा : Triple Camera with Dual OIS
– Telephoto: 12MP PDAF, F2.4, OIS (45°)
– Wide-angle: 12MP Super Speed Dual Pixel AF, F1.5/F2.4, OIS (77°)
– Ultra Wide: 16MP FF, F2.2 (123°)
– 0.5X/2X optical zoom, up to 10X digital zoom
फ्रंट कॅमेरा : Dual Camera
– Selfie: 10MP Dual Pixel AF, F1.9 (80°)
– RGB Depth: 8MP FF, F2.2 (90°)
बॅटरी : 4,100mAh with fast charging 2.0
वजन : 175g
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax (2.4/5GHz) Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB Type-C
सेन्सर्स : Accelerometer, Barometer, Ultrasonic Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Heart Rate Sensor, Proximity Sensor, RGB Light Sensor
किंमत : S10e $749, S10 $899, S10+ $999 (लवकरच भारतीय किंमत सांगण्यात येईल)
या फोन्ससोबत सादर करण्यात आलेली इतर उपकरणे :
गॅलक्सी बड्स इयरबड्स : हे सॅमसंगचे नवे वायरलेस इयरबड्स असून याद्वारे ऐककण्यासोबत बोलण्यासाठी माईकचा समावेश करण्यात आला आहे. यात AKG साऊंड्सचा वापर केलेला आहे!
अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा : https://youtu.be/uzt2PchQAI4
गॅलक्सी फिट आणि गॅलक्सी वॉच अॅक्टिव्ह : सॅमसंगचे स्मार्ट हेल्थ उपकरणांमध्ये नवी उपकरणे आता अधिक सुविधांसह उपलब्ध झाली आहेत. याच खास वैशिष्ट्य म्हणजे Galaxy PowerShare द्वारे हे स्मार्ट घड्याळ गॅलक्सी S10 द्वारेही चार्ज करता येतं!
अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा : https://youtu.be/LRTqadjEkiQ