काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलवामा येथील दुर्दैवी घटनेनंतर हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाला आपल्या परीने शक्य ती मदत करण्यासाठी काही ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून या अधिकृत पर्यायांद्वारे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचेल.
अशा क्षणी काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतःचे अकाउंट क्रमांक सैन्याच्या खातं असल्याचं सांगून व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातून खोटे अकाउंट क्रमांक पसरवून चुकीच्या ठिकाणी पैसे मिळवण्याचे प्रकार घडतात. असे प्रकार होऊ नयेत म्हणून आज आम्ही CRPF कडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या पर्यायांबद्दल माहिती देत आहोत…
हे पर्याय अधिकृत आहेत हे तुम्ही स्वतः लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंक्सवर जाऊन तपासू शकता.
१. भारत के वीर UPI आयडी द्वारे : स्टेट बँक ऑफ इंडियाने bharatkeveer@sbi हा UPI आयडी (VPA) उपलब्ध करून दिला असून हा VPA वापरुन BHIM, Google Pay, PhonePe अशा अॅपमध्ये वरील VPA टाकून तुम्ही शक्य ती मदत थेट भारत के वीर या उपक्रमाकडे पाठवू शकता.
२. भारत के वीर अॅप/वेबसाइटद्वारे : bharatkeveer.gov.in या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आपण मदत पाठवू शकता. भारत के वीर द्वारे केलेली मदत थेट हुतात्मा सैनिकाच्या बँक खात्यामध्ये जमा होते आणि त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध होते!
३. पेटीएमद्वारे उपलब्ध पर्याय : खालील लिंक वापरून तुम्ही CRPF सैनिकांच्या कुटुंबियांना मदत पाठवता येईल. गेल्या काही दिवसात तब्बल १० कोटी रुपये या पर्यायाद्वारे CRPF Welfare Fund साठी उभे केल्याची पेटीएमने दिली आहे!
paytm.com/helpinghand/crpf-wives-welfare-association
अधिकृत माहिती लिंक
1. भारत के वीर UPI : SBI UPI for #BharatKeVeer bharatkeveer@sbi
2. पेटीएमद्वारे सैनिकांच्या कुटुंबाला मदत : CRPF Wives Welfare Association