HMD Global ही कंपनी आता नोकीया ब्रॅंड अंतर्गत स्मार्टफोन्स व इतर उपकरणे विकते. यांनी गेली वर्षी Nokia True Wireless Earbuds सादर केले होते. आता हे इयरबड्स भारतात उपलब्ध झाले आहेत. या इयरबड्सना त्यांच्या डिझाईनबद्दल iFDesign Award 2019 सुद्धा देण्यात आला आहे!
नोकीया ट्रू वायरलेस इयरबड्स ऑफलाइन रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होत असून यांची किंमत ₹९९९९ इतकी असेल! हे इयरबड्स वापरण्यासाठी कोणत्याही अॅपची गरज नसून केवळ ब्ल्युटुथद्वारे पेयर करून लगेच वापरण्यास तयार होतील! याद्वारे आपण फोन कॉल्स, गाणी/संगीत सहज ऐकू शकतो ते सुद्धा कोणत्याही वायर शिवाय! याच्या सोबत एक केस देण्यात येणार असून या केसद्वारे आपण इयरबड्स चार्ज करू शकतो तसेच यांचा वापर करून झाल्यावर केसमध्ये ठेवल्यास ते आपोआप चार्ज होऊन जातील! इयरबड्स ३ ते ४ चार वापरू शकता तर केस एका चार्जमध्ये १४ तास पुरेल एव्हढ चार्ज देऊ शकेल थोडक्यात ही केस इयरबड्सना तीनवेळा पूर्ण चार्ज करू शकेल !
या इयरबड्समधील तांत्रिक बाबी खालीलप्रमाणे सांगितल्या आहेत :
- Ultra-lightweight at only 5 grams per earbud
- Up to 3.5 hours of playback or 4 hours of talk time
- Easy setup with Universal Bluetooth 5.0 – no separate app required
- Stereo music playback and phone calls
- Sweat and splash resistant
- More than just a case
- Brings three additional full charges for your earbuds
- Provides up to 14 hours of playback or 16 hours of talk time
- Single-push button spring release system
- USB Type-C charging
- LED charge indicator