फेसबुकने आज मेसेंजरद्वारे पाठवलेले संदेश डिलीट करण्याची सोय सर्वाना उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही सोय फक्त फेसबुकच्या काही अधिकाऱ्यांनाच होती! आता सर्व यूजर्स एखादा संदेश पाठवल्यावर दहा मिनिटांपर्यंत तो परत घेत डिलिट करू शकतात! हा संदेश वैयक्तिक चॅटमधला किंवा ग्रुपमधला सुद्धा असला तरीही तो अनसेंड करता येईल!
• ही सोय वापरण्यासाठी Facebook Messenger मधील ज्या संदेशाला डिलिट करायचं आहे तो निवडून त्यावर टॅप करा.
• नंतर आलेल्या मेन्यूमधून Remove मग “Remove for Everyone” पर्याय निवडा.
• यानंतर तो संदेश डिलिट केला जाईल आणि इतरांना व्हॉट्सअॅपप्रमाणेच मेसेज डिलिट केला असल्याचं दिसत राहील.
• ही सोय व्हॉट्सअॅपमध्ये असलेल्या डिलिट फॉर एव्हरीवन’ सारखीच असेल!
याबद्दल माहिती देऊन फेसबुकला तब्बल वर्ष उलटलं आणि आता सरतेशेवटी त्यांनी ही सोय सर्वानाच वापरायला दिली आहे. आधी फक्त संस्थापक मार्क झकरबर्गलाच हे करता येत होतं! यापूर्वी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राममध्येही अशी सोय देण्यात आलेली आहे. टेलिग्राम अनेक वर्षांपासून तर व्हॉट्सअॅप गेल्या वर्षीपासून संदेश डिलीट करण्याची सुविधा देत आहे!
Search terms : You Can Now Remove Unsend Sent Messages on Facebook Messenger