व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा प्लॅनमध्ये बदल केले असून अलीकडेच कमी झालेले ग्राहक आणि स्पर्धा यामुळे टेलीकॉम कंपन्या प्लॅन्समध्ये पुन्हा पुन्हा बदल करत आहेत. आता व्होडाफोनने दररोज 1.6GB इंटरनेट डाटा देणारा प्लॅन आणला आहे किंवा जुन्याच प्लॅन मध्ये बदल केला आहे म्हणता येईल. आधीच्या 1.5GB ऐवजी आता 1.6GB/दिवस डाटा मिळेल.
२०९ आणि ४७९ चे प्लॅन्स बदलून 1.5GB ऐवजी 1.6GB डाटा मिळेल बाकी गोष्टी उदा. अमर्याद कॉल्स, 100 SMS, व्होडाफोन प्लेचं सबस्क्रिप्शन जे मोफत टीव्ही, चित्रपट पाहण्याची सोय देतं.
२०९ च्या प्लॅनमध्ये २८ दिवस तर ४७९ प्लॅनमध्ये ८४ दिवस वैधता मिळेल.
प्लॅन किंमत | डाटा | वैधता |
२०९ | 1.6GB | २८ दिवस |
४७९ | 1.6GB | ८४ दिवस |
१९९ | 1.5GB | २८ दिवस |
४५९ | 1.5GB | ८४ दिवस |
वरील प्लॅन्स जानेवारी २०१९ नुसार वैध आहेत कालांतराने यामध्ये बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी सध्याचे प्लॅन्स पाहण्यासाठी अधिकृत लिंक Vodafone Prepaid Plans
आमचे यापूर्वीचे टेलिकॉम संबंधित लेख
▸ पुरेसा बॅलन्स नसला तरीही त्यांची सेवा खंडित करण्यात येऊ नये : ट्रायचा आदेश!
▸सध्याची रीचार्ज प्लॅन्सची स्थिती! : टॉपअप पॅक्स जवळपास बंदच?
▸नोव्हेंबर महिन्यात व्होडाफोन आयडियाचे ६५ लाख ग्राहक कमी!