टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय-TRAI) ने अलीकडेच नवा नियम काढला आहे ज्याद्वारे टीव्ही चॅनल्स, त्यांचे पॅक्स आणि त्यांच्या किंमतींच नियमन करण्यात आलेलं आहे. या नव्या नियमांनुसार ग्राहकांना त्यांना पहायच्या असलेल्या वाहिन्यांचेच पैसे द्यायचे आहेत.
या नव्या नियमानुसार वाहिन्या निवडणं सोपं व्हावं या उद्देशाने ट्रायनेच एक वेबसाईट सादर केली आहे!
Channel Selector Application https://channel.trai.gov.in
हे नवे बदल ग्राहकांना समोर ठेऊन करण्यात आलेले असले तरी त्यांना या नव्या नियमानुसार प्लॅन्स घ्यायला लावणं अधिक अवघड काम आहे. नव्या सिस्टीममध्ये जाण्याचं प्रमाण अगदीच नगण्य असल्याचं सध्यातरी दिसून येत आहे. अर्थात हे साहजिकच असून नवी सिस्टीम अवलंबण्यासाठी ग्राहकांनाच बऱ्यापैकी त्रास सोसावा लागेल.
वरवर सोपं वाटत असलेलं चॅनल निवडीचं काम वाटतं तेव्हढं सोपं नाही. निवडताना ठराविक मर्यादेच्या वर वाहिन्या गेल्यावर अनेकांना असं लक्षात येत आहे कि आपण आधीच्या प्लॅन्सनुसारच कमी पैसे देऊन अधिक वाहिन्या पाहत होतो आणि आता त्याच वाहिन्या पाहण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील या विचाराने बरेच जण याकडे वळण्यास तयार नाहीत. उर्वरित देशात याबाबत काहीच माहिती नसलेल्यांचं प्रमाण फारच मोठं असणार आहे.
या नव्या सिस्टीममध्ये जाण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदत केबल, DTH कंपन्यांना देण्यात आली आहे.
चॅनल्स निवडण्यासाठी काही लिंक्स :
Videocon D2h : d2h.com/login.php?returnurl=map-web.php
Airtel Digital TV : airtel.in/digital-tv/customercorner
Tata Sky : tatasky.com/wps/portal/TataSky/channels/make-my-pack
अधिक माहितीसाठी आमच्या यापूर्वीचा लेख वाचा
ट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम goo.gl/QVTzhB