शेअरचॅट हे सोशल मीडिया अॅप ज्यावर स्टेट्स, गाणी, विनोद, व्हायरल व्हिडिओ इ. गोष्टी १४ भाषांमध्ये शेअर केल्या जातात. त्यांनी त्यांच्या २०१८ मधील कामगिरीविषयी एक रिपोर्ट सादर केला असून त्यामधील माहितीनुसार २० लाख मराठी भाषिक शेअरचॅटचा वापर करतात. प्रथमच इंटरनेटचा वापर करू लागलेल्या यूजर्सचा यामध्ये मोठा सहभाग असल्याच नमूद करण्यात आलं आहे.
रिपोर्टमधील माहिती असे दर्शवते की शेअरचॅटवर मराठी यूजर्सनी तब्बल १.७ कोटी पोस्ट्स शेअर केल्या आहेत ज्यामध्ये विविध फोटो, व्हिडिओ आणि GIF अॅनिमेशन्सचा समावेश होता. कंटेंट पोस्ट करण्यामध्ये ६७ टक्के पुरुष होते तर एकूण वेळ खर्ची घालण्यातही पुरुष यूजर्स पुढे होते असं दिसत आहे. गुड मॉर्निंग संदेश, व्हॉट्सअॅप स्टेट्स अशासाठी बरेच जण या अॅपचा वापर करताना आपण पाहू शकतो…
२०१८ मध्ये शेअरचॅटवर सर्वात चर्चेत राहिलेले विषय खालील प्रमाणे :
- मराठा आरक्षण
- शेतकरी संप
- देवी दर्शन
- गणपती दर्शन
- पंढरपूर वारी
वरील ट्रेंड्सवरून दिसून येईल की इंस्टाग्राम, ट्विटर अशा ठिकाणी पाहण्यात येणार्या ट्रेंड्सपेक्षा हे किती प्रमाणात वेगळे आहेत. स्थानिक भाषेत कंटेंट मांडण्याची आणि त्याला योग्य प्रसिद्धी देण्याची सोय केली की स्थानिक भाषेतला कंटेंट आणखी लोकप्रिय होण्यास मदत होते हे यावरून मांडता येईल. यामध्ये एकूण इमेजेस व टेक्स्ट आधारित कंटेंट तयार करण्यावर अधिक भर असल्याच दिसून येतय. मात्र शेअरचॅटवर शेअर करण्यात येणारा कंटेंट किती प्रमाणात ओरिजिनल आहे किंवा त्याचा दर्जा काय आहे याविषयी फारसा विचार करण्यात आलेला दिसत नाहीय. बर्याच वेळा इतरांचे फोटो, विचार कॉपी करून ते पसरवलेले दिसून येतात. अर्थात हे आता सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पहायला मिळत आहे…!
ShareChat Download Link : ShareChat on Google Play