कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ८ जानेवारीपासून सुरू होत आहे ! या वर्षीचा सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून येत आहे…
यावर्षी AI आधारित उपकरणे, 8K टीव्ही, वॉइस असिस्टंट, नवे लॅपटॉप्स, कार्स, स्मार्ट डिवाइसेस यांची रेलचेल असणार आहे! अनेक कंपन्या आणि त्यांची यावर्षी व भविष्यातील वाटचाल या कार्यक्रमात दिसून येते… या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड (सोनी, एलजी, सॅमसंग, एनव्हीडिया, लेनेवो, एचपी, डेल, एसुस, एएमडी, इ.) यावर्षी कोणती उत्पादने घेऊन आले आहेत ते पाहूया ….मराठीत फक्त मराठीटेकवर…
CES 2019 मध्ये खालील कंपन्यांनी त्यांची उत्पादने सादर केली आहेत :
एलजी (LG)
• LG gram 17” Ultra-Lightweight Laptop : अतिशय कमी वजनाचा 17″ लॅपटॉप!
अधिक माहिती : LG Gram 2019
• गुंडाळला जाणारा टीव्ही : होय गेल्या वर्षीच्या CES मध्ये दाखवलेला टीव्ही यावर्षी उपलब्ध होतोय! टीव्ही पाहून झाला कि आपोआप खाली असलेल्या पेटीत गुंडाळून ठेवला जाईल!
• SL8, SL9 व SL10 साऊंडबार : डॉल्बी अॅटमॉस व डीटीएस दोन्ही सपोर्ट, गूगल असिस्टंटचा समावेश!
• यासोबत इतर उपकरणे उदा. OLED टीव्ही, स्पिकर्स, बीयर तयार करण्याची मशीन, अल्ट्रावाईड मॉनिटर ही सुद्धा सादर करण्यात आली आहेत. यांच्या किंमती नंतर सांगण्यात येतील.
सॅमसंग (Samsung) :
• Q900 8K QLED TV
•75-inch MicroLED 4K TV
• Samsung Notebook Odyssey
• Samsung Notebook 9 Pro : 8GB RAM, 13.3 inch 1080p display, 256 GB
• Samsung Space Monitor : हा डेस्कटॉप टेबलला क्लिपद्वारे जोडून ठेवता येतो!
• Samsung Robot Companions : Bot Care, Bot Air, Bot Retail
एनव्हीडिया (Nvidia) :
• एनव्हीडियाने त्यांच्या मध्यम किंमतीच्या ग्राफिक्स कार्ड्समध्ये नवीन RTX 2060 सादर केलं आहे! GTX 1060 पेक्षा ६०% अधिक वेगवान व 1070 Ti पेक्षा अधिक चांगलं गेमिंग!
• आता FreeSync सपोर्ट असलेल्या मॉनिटर्सना सुद्धा Gsync सपोर्ट ड्रायव्हर अपडेटद्वारे देऊ करणार असल्याच जाहीर केलं आहे! बरेच दिवस एएमडीच्या फ्रीसिंकला स्पर्धा म्हणून Nvidia ग्राफिक्स कार्ड असेल आणि डिस्प्ले फ्रीसिंक आधारित असेल तर Gsync सुविधेचा वापर करता येत नव्हता. आता मात्र Nvidia ने माघार घेतली आहे!
• RTX 2080 ची मोबाइल आवृत्ती सादर आता 4K गेमिंग लॅपटॉपवरही!
• Nvidia Drive AutoPilot : कार निर्मात्यांसाठी ऑटो पायलट सोल्यूशन! स्वतःहुन चालणाऱ्या कार्सच्या निर्मितीत आता एनव्हीडियाचाही सहभाग
सोनी (Sony) :
• 8K रेजोल्यूशन असलेले भन्नाट अँड्रॉइड टीव्ही तेही ९५ इंची…!
• Sony PS-LX310BT : ब्लूटूथ सपोर्ट असलेला रेकॉर्ड प्लेयर
• Sony GTK-P10 स्पिकर्स
• अपेक्षित Sony A6300 कॅमेरा बद्दल अजूनही घोषणा नाही!
डीजेआय (DJI) : डीजेआयने त्यांच्या ड्रोन्ससाठी नवा स्मार्ट कंट्रोल सादर केला असून हा इन बिल्ट डिस्प्ले असलेला कंट्रोलर ड्रोन्स नियंत्रित करण्यासाठी उत्तम टूल असेल. यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून यामुळे शेअर करणं, एडिट करणं, अँड्रॉइड अॅप्स इंस्टॉल करणं अशा गोष्टी सहज करता येतात! याबद्दल व्हिडीओ
कोर्सेयर (Corsair) : नवा लेटसी कमी असलेला RGB हार्पून गेमिंग माऊस
एसुस (Asus) : रोग मदरशिप हा गेमिंग लॅपटॉप, सर्वात कमी बेझल्स असलेला झेनबुक १३
एचटीसी (HTC) : दोन नवे व्हीआर हेडसेट : Vive Cosmos व Vive Pro Eye
व्हर्लपूल (Whirlpool) : स्मार्ट ओव्हन : कॅमेराच्या सहाय्याने पदार्थ ओळखून प्रक्रिया सुरू करतो!
टीपी लिंक (TP Link) : टीपी लिंकने त्यांची नवी राउटर मालिका सादर केली असून हे Wi-Fi 6 स्टॅंडर्डचा समावेश असलेले आहेत. ज्यामुळे हे अधिक सुरक्षित, वेगवान आणि उत्तम कामगिरी करणारे राउटर असतील.