व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या याबद्दल जनजागृती मोहिमेस व्हॉट्सअॅपकडून काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती, यामध्ये प्रामुख्याने न्युज पेपर आणि रेडिओचा समावेश होता परंतु येणाऱ्या दिवसांत व्हॉट्सअॅपकडून व्हिडिओच्या माध्यमातून टीव्ही, सोशल मीडिया यांवर जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपतर्फे पसरविण्यात येणाऱ्या मेसेजेसमुळे अनेक वाईट घटना घडल्या होत्या . यामुळे एकाच वेळी अनेक ग्रुप्समध्ये मेसेज पाठ्वण्यावर व्हॉट्सअॅपकडून निर्बंध आणले गेले होते. याबाबत भारतीय सरकारकडूनसुद्धा व्हॉट्सअॅपला फेक न्यूज विरोधात पावले उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होतीच.
व्हॉट्सअॅकडून हे व्हिडिओ अनेक भारतीय भाषांत तयार करण्यात येणार असून १ मिनिटांचे वेगवेगळे ३ व्हिडिओ पाहायला मिळतील. https://youtu.be/qqHrZ5C1poY
खालील प्रमाणे वृत्तपत्रातसुद्धा जाहिराती देण्यात आल्या आहेत.
व्हॉट्सअॅतर्फे सांगण्यात आलेले उपाय :-
- कोणताही संदेश फॉरवर्ड करताना त्याची सत्यता नक्की पडताळा. एखादा संदेश अनेक ग्रुपवर आला आहे तर तो सत्यच असेल असे नाही.
- अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडा. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाका. अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैरप्रकार आणखी वाढतातच.
- जर कोणी आपणास अफवा पसरविण्यास सांगत असेल तर अशा लोकांना ब्लॉक करा.
इतर व्हिडिओ पाहण्यासाठी – व्हॉट्सअॅप यूट्यूब
आमच्या सोशल मीडियाबद्दल महत्वाच्या सूचनांचा लेख अवश्य वाचा आणि इतरांनासुद्धा सावध करा.
https://www.facebook.com/marathitechblog/posts/622925444521524
खोट्या आणि हानिकारक वेबसाईट/ऑफर्सपासून सावध राहण्यासाठी आमचा हा लेख नक्की पहा – येथे क्लिक करा .