व्हेअर इज माय ट्रेन (Where is my Train?) या ट्रेनची स्थिती दर्शविणाऱ्या अॅपचं गूगलकडून अधिग्रहण करण्यात आले आहे. व्हेअर इज् माय ट्रेनच्या वेबाइटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सिगमॉइड लॅब (Sigmoid Labs) द्वारे हे अॅप डेव्हलप करण्यात आले असून गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात या अॅपची गूगल असिस्टंटसोबत भागीदारीची घोषणा करण्यात आली होती.
व्हेअर इज माय ट्रेन अॅपच्या माध्यमातून आपण ट्रेनची सद्यस्थिती तसेच वेळापत्रक पाहू शकता. या अॅपबाबत महत्वाची बाब अशी की यासाठी इंटरनेट किंवा GPS ची गरज भासत नाही त्यामुळे आपण प्रवास करताना इंटरनेट उपलब्ध नसल्यासही ट्रेनच्या सद्यस्थितीची माहिती मिळवू शकता. त्यासोबतच कोच लेआऊट, सीट उपलब्धता प्लॅटफॉर्म नंबर याबद्दल सुद्धा अपडेट्स मिळतात. हे अॅप ८ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
व्हेअर इज माय ट्रेनची टीम यानंतर गूगल मध्ये सामील होत असून टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन आणखी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी गूगल सोबत जाण्यास आम्ही उत्साही आहोत असे व्हेअर इज् माय ट्रेन टीम तर्फे सांगण्यात आले आहे.
डाउनलोड लिंक – Where is my Train
search terms : google acquires where is my train info app