गूगलच्या क्रोम डेव्हलपर कॉन्फरन्स कार्यक्रमात स्क्वूश (Squoosh) या उत्तम इमेज कन्व्हर्टर आणि कंप्रेसर सुविधेच सादरीकरण झालं. या सुविधेमुळे आता आपल्याकडे असलेली इमेज विविध इमेज फॉरमॅट्स उदा JPG, PNG यांच्यामध्ये कन्व्हर्ट करता येतील आणि सोबत कंप्रेशनचा वापर करून गुणवत्तेवर फारसा फरक पडू न देता साईज कमी करता येईल! Squoosh ही गूगलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये एक प्रयोग म्हणून विकसित करण्यात आलेली सेवा आहे.
ही सोय थेट ब्राऊजरमध्येच वापरता येईल ह्यासाठी स्वतंत्र डाउनलोडची गरज नाही. अगदी स्मार्टफोन्समधील ब्राऊझरमध्येही ही सुविधा उत्तम प्रकारे चालेल! Squoosh मध्ये सध्या OptiPNG, MozJPG, WebP, Browser PNG, Browser JPG व WebP हे इमेज फॉरमॅट सपोर्ट करत असून यांचे पॅरामीटर बदलण्याची सुद्धा सोय देण्यात आली आहे! Resize, Convert व Compress ही कामे Squoosh करू शकेल!
- squoosh.app साईटवर जा
- हवी ती इमेज ड्रॅग, ड्रॉप करा किंवा दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
- उजवीकडे योग्य ते पर्यायगरजेनुसार निवडा.
- स्क्रिनवर मधल्या भागात दिसत असलेली रेष पूर्वी आणि कंप्रेशननंतर दिसणारी इमेज यांचा प्रिव्ह्यू दर्शवेल.
- आता उजव्या कोपऱ्यातील डाउनलोड आयकॉन दाबून इमेज तुमच्या पीसी/फोनवर सेव्ह करा!
Informative