तैवानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एसुसने त्यांच्या TUF गेमिंग लॅपटॉप्समध्ये दोन नवे मॉडल भारतात आणले असून गेमर्ससाठी हे उत्तम पर्याय ठरणार आहेत. एसुसची टफ मालिकेमधील उत्पादने कामगिरी व टिकाऊपणा अशा दोन्ही बाबतीत उत्कृष्ट असतात. मराठीटेकच्या PC Build व्हिडीओमध्येही आम्ही टफ सिरीज मदरबोर्ड वापरला होता.
Asus FX505 व FX705 या लॅपटॉप्समध्ये Intel Core i7-8750H प्रोसेसर व NVIDIA GeForce GTX 1060 ग्राफिक्स कार्ड असणार आहे. यांची किंमत ७९,९९० आणि १२४९९० अशी आहे. यांचा डिस्प्ले अल्ट्रा स्लिम प्रोफाइल असलेला आहे ज्याला नॅनो एज असं नाव देण्यात आलं आहे. गेम्स खेळताना चांगल्या अनुभवासाठी 144GHz रिफ्रेश रेट असून १००% sRGB रंग दाखवू शकतो. कीबोर्ड RGB असल्यामुळे हवे ते रंग दाखवू शकतो. यामध्ये हायपरकुल तंत्राचा समावेश आहे.
Asus TUF FX705 specifications:
प्रोसेसर : 8th Gen Intel Core i5-8300H / i7-8750H
रॅम : 32GB पर्यंत
स्टोरेज : 1TB पर्यंत HDD + 512GB पर्यंत SSD
डिस्प्ले : 17.3″ Full HD 144Hz
GPU : Nvidia GeForce GTX 1060
इतर : 1 x Type-A USB2.0, 2 x Type-A USB 3.0 (USB 3.1 Gen 1), 1 x RJ45 LAN jack for LAN insert, 1 x HDMI, 1 x COMBO audio jack
बॅटरी : 4 -Cell, 64 Wh Polymer Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home/Pro
एसुसने भारतातील ३०% गेमिंग बाजारपेठ काबीज करण्याचं विश्वास व्यक्त केला असून गेमिंगसाठी अनेक उतपादने सादर करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.