गूगलने येती स्ट्रीमिंग सर्व्हिस या नावाची सेवा आता प्रोजेक्ट स्ट्रीम या नावाने सादर केली असून या सेवेद्वारे गूगल क्रोम या इंटरनेट ब्राऊजरमधून गेम्स स्ट्रीम करता येतील! यासाठी पहिली गेम असासिन्स क्रीड ओडिसी जोडण्यात आली असून या शुक्रवारी ही गेम उपलब्ध होत आहे.
प्रोजेक्ट स्ट्रीम क्रोम ब्राऊजरमार्फत काम करत असल्यामुळे विंडोज, मॅकओएस, लिनक्स व क्रोमओएस या सर्वांवर चालू शकेल! सध्या चाचणी सुरु असलेली ही सेवा मर्यदित लोकानाच उपलब्ध करून देण्यात येत असून 25Mbps इंटरनेट स्पीड, गूगल व युबीसॉफ्टचं अकाउंट असावं असं गूगल कडून सांगितलं आहे. गेम्स खेळण्यासाठी कीबोर्ड, माउस किंवा USB कंट्रोलर चालेल. या सेवेसाठी Sign Up करण्यासाठी लिंक projectstream.google.com (सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध)
अशा प्रकारच्या गेम स्ट्रीमिंग सेवा अजूनही म्हणाव्या तेव्हढ्या प्रगत नसल्या तरी गेमिंगमधील क्लाऊड कॉम्पुटिंगच्या दृष्टीने पडलेलं एक पाऊल म्हणता येईल. गेमर्सनी दरवेळी नवं महागडं हार्डवेअर खरेदी करणं शक्य नाही त्याऐवजी ह्या हार्डवेअरची गरज काढून टाकून इंटरनेट क्लाऊडवरच गेम खेळता येईल जेणेकरून गेम्स खेळणं आणि स्ट्रीम करणं दोन्ही इंटरनेट मार्फत होईल तेही कमीत कमी हार्डवेअरमध्ये! AAA गेम्स ज्यामध्ये खूप मोठा मॅप आणि त्या गेमच्या कथेचं भाग असलेली शहरं सहज रेकॉर्ड होऊन स्ट्रीम करता येणं अशा स्ट्रीमिंगचं मुख्य लक्ष्य राहील. या चाचणीदरम्यान 60FPS वर सुरू असलेली गेम 1080p रेजोल्यूशनवर स्ट्रीम करण्यात आली!
अधिकृत माहिती : Pushing the limits of streaming technology
सध्या स्ट्रीमिंगसाठी ट्विच जी सर्वात लोकप्रिय आहे, मायक्रोसॉफ्टची मिक्सर (Mixer), गूगलची युट्युब, फेसबुकची FB.GG या सेवांशी प्रोजेक्ट स्ट्रीमची स्पर्धा असेल. येत्या काळात निंटेंडो वगैरे कंपन्यासुद्धा स्वतःचे पर्याय आणणार असल्याचं चर्चेत आहे.
search terms project stream by Google will allow gamers to stream videos from Chorme Browser