सध्या फेसबुक कडे मालकी असलेल्या ऑक्युलस व्हीआर कंपनीचा नवा गेमिंग हेडसेट ज्याचं नाव Oculus Quest असं असेल आणि हा २०१९ मध्ये $399 (~₹ २९,०००) किंमतीत उपलब्ध होईल.
व्हर्च्युअल रिअॅलिटी ही संकल्पना गेल्या काही वर्षात जोर धरताना दिसत आहे अलीकडे याच प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरी अजूनही बऱ्याच कंपन्या यावर काम करत आहेत. अलीकडे स्मार्टफोन्समध्ये देण्यात येत असलेल्या AR ऑग्मेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानामध्ये आभासी आणि वास्तव अशा दोन्ही गोष्टींचा वापर केलेला असतो. मात्र VR म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये पूर्णतः आभासी जगात वावरता येतं. याचाच उपयोग करून हा नवा हेडसेट ज्याला कॉम्पुटर किंवा इतर कसल्याही वायर्स जोडण्याची गरज नाही बनवण्यात आला आहे. यावेळी याच प्रमुख लक्ष्य गेमिंग कडे असल्याचं दिसून येत आहे.
मोशन कंट्रोल्ड गेमिंग असलेल हे डिव्हाईस वायरलेस आहे. ऑक्युलस गो जो काही महिन्यांपूर्वी $200 मध्ये सादर झाला होता त्यामधील काही सुविधा उचलून हा स्वतंत्र हेडसेट बनवला आहे. ऑक्युलस गोसुद्धा फोनवर अवलंबून न राहणाऱ्या मोजक्या हेडसेट्स पैकी एक होता. क्वेस्टच्या डिस्प्लेचं रेजोल्यूशन 1600×1440 असं आहे. यामध्ये Snapdragon 835 हा प्रोसेसर जोडलेला असेल. यासोबत ५० गेम्स मिळणार आहेत.