मायक्रोसॉफ्टने ऑफिस २०१९ व्हर्जन विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टिमसाठी उपलब्ध करून दिले आहे. ऑफिस 365 प्रो प्लस व्हर्जन ग्राहकांसाठी जास्त प्रोडक्टिव व सुरक्षित अनुभव असून यामध्ये कमी किंमत मोजावी लागत असूनही जे ग्राहक क्लाऊडसाठी तयार नाहीत अशा ग्राहकांसाठी ऑफिस २०१९ द्वारे नवीन फिचर्स आणि अपडेट दिले जात आहेत असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. ऑफिस २०१९ ग्राहकांना महत्वाच्या सुधारणा उपलब्ध करून देते जे क्लाऊड कनेक्टेड नाहीत किंवा नेहमी अपडेट मिळवत नाहीत.
ऑफिस २०१९ मधील सुधारणा या ऑफिस २०१९ प्रो प्लस या क्लाऊडवर आधारित व्हर्जनच्या मागील ३ वर्षातील सुधारणा आहेत. क्लाऊडवर आधारित ऑफिस म्हणजे थोडक्यात असे की आपणास कॉम्प्युटर/लॅपटॉपवर ऑफिस इंस्टॉल करावे लागत नसून आपण वेबसाईट वरूनच वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट यांसारखे टूल्स वापरू शकतो. यासाठी सर्व प्रोसेस सर्व्हरद्वारे केली जाते व आपणास फक्त ब्राऊझरचा वापर करून क्लाऊड वर आधारित ऑफिस वापरता येते. ऑफिस २०१९ हे वन टाईम रिलिज असून यानंतर नवीन फीचर अपडेट उपलब्ध होणार नाहीत परंतु नवीन आवृत्ती मात्र उपलब्ध होतील असे मायक्रोसॉफ्टतर्फे सांगण्यात आले आहे.
ऑफिस २०१९ च्या मदतीने कमी वेळात चांगले साहित्य तयार करण्यास ग्राहकांना मदत होईल. पॉवर पॉइंट मध्ये सिनेमॅटिक प्रेझेंटेशनचा समावेश करण्यात आला असून अधिक दर्जेदार स्लाईड तयार करता येतील. एक्सेल २०१९ मध्ये डेटा विश्लेषण टूल, नवीन फॉर्म्युला, चार्ट तसेच पॉवरपॉइंटमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. वर्ड २०१९ मध्ये फोकस मोड, टेक्स्ट स्पेसिंग, रिड अलाउड सारख्या सुधारणांचा समावेश आहे.
अधिक सुविधा जाणून घेण्यासाठी – Office 2019 FAQ
मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक परवाना असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ऑफिस २०१९ आजपासून उपलब्ध असेल मात्र सर्व ग्राहकांना येणाऱ्या आठवड्यांत हे उपलब्ध करून दिले जाईल.
अधिकृत माहिती : Office 2019 is now available for Windows and Mac