रिलायन्स जिओला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जिओकडून यानिमित्त 8GB चे दोन व्हाउचर ग्राहकांना मोफत मिळणार आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी Reliance AGM वार्षिक कार्यक्रमात रिलायन्स जिओ टेलिकॉम सेवा सादर केली होती. जिओच्या आगमनानंतर डेटा वापरात झपाट्याने वाढ झाली असून डेटापॅकचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
जिओकडून 8GB चे दोन व्हाउचर मिळणार असून पहिले व्हाउचर या सप्टेंबरमध्ये तर दुसरे व्हाउचर पुढील महिन्यात अकाउंटवर जमा केले जाणार आहे. या अंतर्गत येणार 8GB डेटा एकाच वेळेस वापरता येणार नसून तुमच्या अकाउंटवर जमा झाल्यानंतर दिवसाला 2GB डेटा ४ दिवसांसाठी वैध राहील. हे दोन्ही व्हाउचर महिन्याच्या २० तारखेआधी आपोआपच जमा केले जातील. MyJio अॅपमधून “My Plans” विभागात आपण वापराबद्दल माहिती मिळवू शकता.
यासोबतच डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर सुद्धा ग्राहकांना अतिरिक्त १ GB डेटाचा लाभ घेता येणार असून यासाठी थोडे दिवसांत आपणास MyJio अॅपवर बॅनर दिसेल ज्यावर क्लिक करून रिकाम्या कॅडबरीवरील बारकोड स्कॅन करावा लागेल. ही ऑफर ३१ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असेल.