भक्तिमय वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या दिवसांत विविध मंडळांचे निरनिराळे देखावे, सजावट आकर्षित करतात. मानाचे तसेच प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेकांना विविध कारणास्तव मानाच्या प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेता येत नाही यासाठीच अनेक मंडळांतर्फे लाईव्ह कव्हरेज उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून घरबसल्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल व आरती, पूजा पाहता येईल. त्याचबरोबर ३६० अंशात दर्शनाची व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. खालील प्रसिद्ध गणपतींचे लाईव्ह दर्शन आपणास घेता येईल…
लालबागचा राजा:- मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्याय भाविकांसमोर उपलब्ध आहेत. मंडळाचे फेसबुक पेज तसेच युट्यूब चॅनेल त्याचबरोबर वेबसाईट अशा तिन्ही ठिकाणी लाईव्ह कव्हरेज आपणास पाहता येईल.
- लालबागचा राजा फेसबुक पेज – Lalbaugcha Raja on Facebook
- युट्यूब – Lalbaugcha Raja on YouTube
- वेबसाईट – http://www.lalbaugcharaja.com/
- ३६० व्हर्च्युअल टूर – लालबागचा राजा व्हर्च्युअल दर्शन
श्रीमंत दगडूशेठ गणपती : पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन वेबसाईटवर उपलब्ध आहे. खालील वेबसाईटवर जाऊन आपण दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊ शकता.
- वेबसाईट – Dagdusheth Ganpati Live
श्री सिद्धिविनायक गणपती:- मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन सुद्धा वेबसाईटवरून होईल. खालील लिंकवर जाऊन आपण दर्शन घेऊ शकता.
- वेबसाईट – Siddhivinayak Darshan Online
त्याचबरोबर मुंबईतील अनेक गणपतींचे ३६० अंशात व्हर्च्युअल दर्शन घेण्यासाठी आपण पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता. Click360.in या वेबसाईटवरून ३६० अंशात व्हर्च्युअल टूर करता येईल.