यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसची दुसरी आवृत्ती आज सादर करण्यात आली. UPI 2.0 मध्ये अनेक नव्या सोयींची जोड देण्यात आली असून याद्वारे पैशांची ऑनलाईन देवाण घेवाण आणखी सोपी होईल!
मुंबईमध्ये काही ठराविक NPCI सदस्यांच्या उपस्थितीत याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. National Payments Corporation of India (NPCI) ही सरकारी संस्था सर्व पेमेंट करण्याच्या पद्धतींची देखरेख करण्याचं काम करते. यूपीआय (UPI) प्रथम (11 April 2016) उपलब्ध करून देण्यात आलं तेव्हाच याची उपयुक्तता मोठी होती. कमी रकमेच्या पैशांची देवाण घेवाण यामुळे फारच सहजसोपी झाली आहे. भीम अॅप, गूगल तेझ, फोनपे, विविध बँकांची अॅप्स, आता पेमेंट गेटवेद्वारे सुद्धा यूपीआय मार्फत व्यवहार करता येतात.
UPI 2.0 मधील काही ठळक सोयी :
1. Linking of overdraft account: सध्या सेव्हिंग्स व करंट अकाउंट जोडता येतात मात्र आता ओव्हरड्राफ्ट अकाउंट सुद्धा UPI ला लिंक करता येणार आहे. या जोडलेल्या ओव्हरड्राफ्ट खात्याचा वापर करत लगेच व्यवहार करता येतील आणि सोबत त्या खात्याच्या सर्व सोयीचा सुद्धा लाभ घेता येईल!
2. One-time mandate: यामुळे आपण एखाद्या दुकानातून खरेदी केली मात्र त्या क्षणी आपल्याकडे खात्यामध्ये पैसे नसतील तर UPI द्वारे अशी आज्ञा (मॅनडेट वापरू) देऊ शकतो आणि दुकानदाराशी एक ज्यामुळे आपल्याला पैसे नंतर देता येतील! थोडक्यात तो व्यवहार pre-authorise करून दोन्ही बाजूनी मान्य केलेला असेल मात्र पैसे नंतर पाठवले जातील! व्यापारी आणि ग्राहक दोघानांही अडचण येत नाही. ज्या दिवशी खरेदीची तारीख सेट केलेली असेल त्या दिवशी पैसे आपोआप व्यापाऱ्याच्या (किंवा व्यक्तीच्या) खात्यामध्ये पाठवले जातील!
3. Invoice in the inbox : आता ग्राहकांना विक्रेत्यानं पाठवलेली पावती आधी इनबॉक्समध्ये पाठवली जाईल ज्यामुळे ग्राहक नेमकी रक्कम आकारली आहे का व त्याच विक्रेत्याची पेमेंट रिक्वेस्ट आली आहे का ते तपासून पाहू शकतो. इनबॉक्समधील पावतीवर रक्कम तपासून झाली की ग्राहक विक्रेत्याला सहज पैसे पाठवू शकेल!
4. Signed intent and QR: ही सोय ग्राहकांना QR कोड स्कॅन करताना विक्रेत्याची माहिती खरी आहे का हे पाहण्यासाठी उपयोगी पडेल. ही सोय ग्राहकांना त्या विक्रेत्याच्या माहितीची अधिकृत पडताळणी झाली आहे का नाही हे सांगेल! जर तो विक्रेता सुरक्षित नसेल तर तसं नोटिफिकेशन ग्राहकांना दिली जाईल.
सध्याच्या तारखेला UPI 2.0 च्या सदस्य असलेल्या बॅंक्स पुढील प्रमाणे : State Bank of India (SBI), HDFC Bank, Axis Bank, ICICI Bank, IDBI Bank, RBL Bank, YES Bank, Kotak Mahindra Bank, IndusInd Bank, Federal Bank and HSBC
अधिकृत माहिती : UPI 2.0
थोड्या कालावधीनंतर आणखी बॅंक्स जोडल्या जातील! नोटबंदीनंतर खरेतर पेटीएम ऐवजी BHIM किंवा UPI च्या इतर पद्धती प्रसिद्ध व्हायला हव्या होत्या मात्र आता परिस्थिती अशी आहे कि UPI पेक्षा पेटीएमचे QR कोड दुकानात लावलेले दिसतात. आता पेटीएम पेमेंट्स बँकद्वारेही UPI मार्फत व्यवहार करता येतात! तरीही गेल्या दोन वर्षात UPI ला मिळणार प्रतिसाद पाहता येत्या काळात कमी रकमेचे जास्तीतजास्त व्यवहार यूपीआयद्वारे पार पाडले जातील असं चित्र दिसत आहे ! BHIM UPI द्वारे जुलै २०१८ मध्ये ४५८४५ कोटी रुपयांचे व्यवहार पार पडल्याचं सांगण्यात आलं आहे.
यावेळी श्री. नंदन निलेकणी (इन्फोसिस) , श्री.उर्जित पटेल (आरबीआय गव्हर्नर), श्री.रजनीश कुमार (एसबीआय प्रमुख), श्री.बिस्वमोहन महापात्रा (NPCI अध्यक्ष) उपस्थित होते.
संदर्भ लेख :
- UPI यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?
- यूपीआय कसे वापरायचे फोनपे अॅपसोबत याबद्दल मराठीमध्ये व्हीडीओ
- भीम अॅप कसे वापरायचे ? याबद्दल मराठीमध्ये व्हीडीओ
search terms : upi 2.0 launched by NCPI information in marathi