डीजेआय (DJI) कंपनी ड्रोन बाजारातील आघाडीचं नाव. त्यांच्या घडी घालता येणाऱ्या मॅविक ड्रोनच्या २०१६ मध्ये आलेल्या पहिल्या आवृत्तीला मोठं यश मिळालं. त्यानंतर Mavic Air and Mavic Spark आणि आज त्याच ड्रोनची नवी आवृत्ती DJI Mavic 2 Pro व Mavic 2 Zoom सादर करण्यात आले आहेत.
DJI Mavic 2 Pro व Mavic 2 Zoom फरक फक्त दोन्ही मध्ये असलेल्या कॅमेराचा आहे. DJI ने हे ड्रोन त्यांचे सर्वात प्रगत असल्याचं सांगितलं आहे.
Mavic 2 Pro : २०१७ मध्ये हॅसलब्लॅड कंपनीचं अधिग्रहण केल्यावर आता त्यांचा कॅमेरा Mavic 2 Pro मध्ये पाहायला मिळेल जो Zoom पेक्षा मोठा आणि अधिक चांगला गुणवत्ता असलेला असेल.
20 megapixel फोटो काढता येतात तर Hasselblad चं Natural Color Solution (HNCS)तंत्र अधिक अचूक रंग टिपण्यासाठी वापरण्यात आलं आहे. यामध्ये अॅपर्चर सुद्धा बदलता येत!(f/2.8-f/11 दरम्यान)
Mavic 2 Zoom : यामध्ये 2x optical (24-48mm) आणि 2x digital zoom असेल आणि एकत्रित 96mm लेन्स चा इफेक्ट मिळेल! यात 12-megapixel कॅमेरा आहे जो ‘Super Resolution’ या सोयीद्वारे ९ फोटो एकात एक जोडून super high-res 48-megapixel फोटो काढू शकेल मुख्यतः landscape photography साठी !
या ड्रोन्समध्ये Dolly Zoom मोड आहे ज्याद्वारे चित्रपटांमध्ये वापरला जाणारं भन्नाट दृश्य थेट ड्रोनमधून काढता येईल! Hyperlapse चा सुद्धा समावेश असून यासाठीसुद्धा काही पर्याय देण्यात आले आहेत! अडथळा आल्यास मार्ग बदलण्यासाठी सेन्सर आता सर्व बाजूंनी काम करेल!
Introducing the DJI Mavic 2 : https://youtu.be/7SembcsxrQw
किंमत :
DJI Mavic 2 Pro : $1,499
DJI Mavic 2 Zoom : $1,249
बॅटरी : 3850 mAh
वजन : Mavic 2 Pro: 907 g आणि Mavic 2 Zoom: 905g
१८ किमी रिमोट रेंज आणि अर्धा तास फ्लाईट टाइम! ८ किमी अंतरावरून FHD लाईव्ह फीड!
Mavic 2 Pro : 1″ CMOS सेन्सर!
search terms DJI Mavic 2 Pro Mavic 2 Zoom Drones