रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार डिजीलॉकर (DigiLocker) आणि mParivahan वरील डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार आहेत. यामुळे आपणासोबत डॉक्युमेंट(हार्ड कॉपी) सोबत ठेवण्याची गरज राहणार नसून डिजीलॉकर किंवा mParivahan अॅपद्वारेसुद्धा आपण ड्रायविंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि इतर डॉक्युमेंट्स ट्रॅफिक पोलीसांना पडताळणीसाठी दाखवू शकता. त्यामुळे कधी ओळखपत्र विसरल्यास याचा फायदा नक्की होईल.
DigiLocker / mParivahan हे क्लाऊड स्टोरेज आधारित प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर आपण आपले डॉक्युमेंट्स/ ओळखपत्रे साठवू शकता जेणेकरून आपणास हार्ड कॉपी बाळगन्याची गरज भासणार नाही. Information Act 2000 नुसार DigiLocker / mParivahan प्लॅटफॉर्म वरील इलेक्ट्रॉनिक ओळखपत्रे किंवा डॉक्युमेंट्स कायदेशीररीत्या ग्राह्य धरली जावीत असे निर्देश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
याचबरोबर गाडी च्या इन्शुरन्स चा डेटा सुद्धा इन्शुरन्स इन्फॉर्मशन बोर्ड (IIB) तर्फे वाहन डेटाबेस वर दररोज अपडेट केला जात असल्याकारणाने mParivahan / eChallan ऍप वर सध्य स्तितिथील पॉलीसी उपलब्ध असेल तर हार्ड कॉपी दाखवणे अनिवार्य नसेल.
DigiLocker बद्दल मराठी व्हिडिओ : https://youtu.be/MKkXDJqhopk
ट्रेनने प्रवास करताना सुद्धा आपण डिजिलॉकर वरील आधार तसेच ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल. अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
परंतु वरील सर्व डॉक्युमेंट्स तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा ते Issued Documents मध्ये असतील. जर आपण स्वतः डिजिलॉकर वर फक्त डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर मात्र ते ग्राह्य धरले जाणार नसून आपणास व्हेरिफाय करणे गरजेचे आहे.
वापर कसा कराल ?
प्रथम आपणास https://digilocker.gov.in वर जाऊन साइन अप करावे लागेल. आपण आपल्या आधारच्या मदतीने OTP द्वारे सुद्धा हे करू शकता. एकदा अकाउंट ओपन केल्यानंतर Issued Documents विभागातमध्ये जाऊन Check partners section वर क्लिक करून आपण खालीलप्रमाणे हवे असणारे डॉक्युमेंट्स रजिस्टर असणाऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटसोबतच एजन्सी, एज्युकेशन बोर्ड इत्यादींचे सर्टिफिकेट/डॉक्युमेंट्स पुल करून वापरता येतील.