सध्याचं संवादासाठी वापरलं जाणारं माध्यम म्हणजे व्हॉट्सअॅप. रोज प्रत्येक जण या ना त्या कारणासाठी संदेश, छायाचित्रे, व्हिडीओ, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स याद्वारे पाठवतोच. काही महिन्यांपूर्वी व्हॉइस कॉल व नंतर व्हिडीओ कॉलची सेवा सुद्धा व्हॉट्सअॅपला जोडण्यात आली होती. इंटरनेटद्वारे कॉल्स असल्यामुळे विदेशी गेलेल्याशी संपर्कासाठी उत्तम पर्याय होता. मात्र दरम्यान इतर स्पर्धकांनी इतरही अनेक सोयी देण्यास सुरुवात केली. शेवटी आता व्हॉट्सअॅपने सुद्धा ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे…!
सध्या व्हॉट्सअॅपवर तब्बल २०० कोटी मिनिटांचे कॉल्स दर दिवशी केले जात आहेत! आता व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स दोन्ही सुद्धा ग्रुपमध्ये अनेकांसोबत करता येतील! कधीही कुठेही आपण आपल्या संपर्कामधील चार लोकांसोबत ग्रुप कॉल करू शकतो!
ग्रुप कॉल कसा करायचा ? : प्रथम कोणत्याही एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्टवर जाऊन त्या व्यक्तिसोबत कॉल सुरु करा. कॉल सुरु होताच वर उजव्या कोपऱ्यात “add participant” बटन दिसेल त्याद्वारे आपण आणखी तिघांना त्या संभाषणात सहभागी करून घेऊ शकतो!
अधिकृत माहिती : WhatsApp Group Calling for Voice and Video Is Here
ग्रुप कॉल्स सुद्धा नेहमी end-to-end एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केलेले असतील. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी हळूहळू उपलब्ध करून दिली जात आहे. तुम्ही व्हॉट्सअॅप प्ले स्टोरमध्ये अपडेट करून घ्या जर add participant पर्याय दिसत नसेल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. या सेवेची rollout प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.
search terms whatsapp group video call voice call android ios iphone