पर्सनल कम्प्युटर्सच्या विक्रीमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेली घसरण या वर्षी थांबून २०१२ नंतर प्रथमच चक्क विक्रीमध्ये वाढ नोंदवली आहे. मार्केट रिसर्च संस्था गार्टनर आणि आयडीसी यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार पीसी विक्रीमध्ये अनुक्रमे १.४ टक्के व २.७ टक्के वाढ झाल्याचं नोंदवलं आहे!
या विक्रीच्या वाढीमागे बिझनेस ग्राहकांसाठी डेस्कटॉप्स आणि गेमिंग पीसी कारणीभूत असल्याच सांगितलं जात आहे. विंडोज १० असलेल्या बिझनेस पीसीमुळे डेस्कटॉप पीसी घेण्याकडे वाढता कल दिसत आहे. तरीही या डेटासाठी गूगलच्या क्रोमबुक्सचा ग्राह्य धरण्यात आलेलं नाहीय.
आयडीसीच्या माहितीनुसार एचपी, डेल, लेनेवो, अॅपल आणि एसर सर्वांनीच त्यांच्या एकूण पीसी विक्रीमध्ये वाढ झाल्याचं नमूद केलं आहे. येत्या दोन वर्षात ही वाढ पुन्हा कमी होण्याकडे घसरेल अस मतसुद्धा मांडण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यात स्मार्टफोन्सची विक्री घटल्याच दिसून येत होतं त्या पार्श्वभूमीवर पीसीची विक्री वाढण नक्कीच आश्चर्यकारक वाटत असलं तरी भविष्यात लहान आकाराच्या कम्प्युटर्सनाच मागणी असेल हे ही तितकं च खरं आहे…!
मराठीटेकचा कम्प्युटर कसा तयार करायचा याबद्दल व्हिडिओ : How to Build a Gaming PC Guide in Marathi
search terms PC sales are growing for the first time in six years