व्हॉट्सअॅपने त्यांच्या नव्या अपडेटमध्ये एक नवी सोय दिली आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीने आपल्याला पाठवलेला संदेश त्याने स्वतः लिहला आहे की तिसर्याच व्यक्तीकडून आलेला संदेश आपल्याला पाठवला आहे ते समजेल. यामुळे काही प्रमाणात खोट्या गोष्टी व्हॉट्सअॅपद्वारे पसरण्यास आळा असेल असा अंदाज आहे. (किंवा असं अपेक्षित तरी आहे!) सोशल मीडियावर पसरणार्या स्पॅम/फेक(खोट्या) न्यूज संदर्भात हे पाऊल व्हॉट्सअॅपने उचललेल आहे. यामुळे खोट्या गोष्टी पसरण कितपत थांबू शकेल हे नंतर कळेलच. यासंदर्भात मराठीटेकचा हा लेख नक्की वाचा.
ही नवी सोय सध्या चाचणी स्वरुपात उपलब्ध आहे (व्हर्जन 2.18.159). काही दिवसांपूर्वी मीडिया व्हिजिबिलिटी चाचणीसाठीच फीचर देण्यात आलं होत ज्यामुळे व्हॉट्सअॅपमधील फोटो गॅलरी अॅपमध्ये दिसणार नाहीत! Show Media in Gallery असा पर्याय काही दिवसात सर्वांसाठी उपलब्ध होईल.
Search terms whatsapp forward social media fake news spam prevention