गिटहब बाबत सुरु असलेल्या गेल्या काही आठवड्यांच्या चर्चेनंतर आज अधिकृतरीत्या त्यांचं मायक्रोसॉफ्टने अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं! गिटहब ही git म्हणजे व्हर्जन कंट्रोल सिस्टिम आधारित कोड शेअरिंग वर काम करणारी वेबसाइट आहे. अनेक डेव्हलपर्स त्यांचे प्रोजेक्ट GitHub द्वारे जगासमोर ठेवत असतात. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरची संख्या मोठी आहे. या साईटवर एकमेकांचे कोड पाहत एकाच वेळी अनेकांना एका प्रोजेक्टवर काम करता येतं. यासाठीच हा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म प्रसिद्ध आहे. या अधिग्रहणाची किंमत मायक्रोसॉफ्टच्या स्टॉक्सद्वारे $7.5 billion (₹ ५०३ अब्ज रुपये!) असून गिटहबच २०१५ मध्ये व्हॅल्यू $2 billion इतक होत.
पूर्वीचे झामारीन (Xamarin) सीईओ नॅट फ्रिडमन (सध्याचे मायक्रोसॉफ्ट वॉइस प्रेसिडेंट) गिटहबचे नवे सीईओ असतील. गिटहबचे संस्थापक क्रिस वॅनस्ट्राथ मायक्रोसॉफ्ट Technical fellow बनतील.
गिटहबवर मार्च २०१८ पर्यंत २.८ कोटी डेव्हलपर्स आहेत आणि ८.५ कोटी कोड Repository आहेत! यामुळेच ही सोर्स कोड असलेली सर्वात मोठी वेबसाइट आहे मायक्रोसॉफ्टच्या या सहभागामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपर्स नाराज आहेत. काहींनी तर GitLab सारखे इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी हॉटमेल, माईनक्राफ्ट, स्काईप, लिंक्डइन अशा सेवांचं अधिग्रहण केलं आहे!
या अधिग्रहणाबद्दल मायक्रोसॉफ्ट प्रमुख सत्या नाडेला यांचं ट्विट :
Microsoft + GitHub = Empowering Developers https://t.co/KqLacgODdk— Satya Nadella (@satyanadella) June 4, 2018