एसरचे हे Nitro 5 गेमिंग लॅपटॉप आता इंटेलच्या 8th gen Coffee Lake व एएमडीचे Ryzen 5 प्रोसेसर पर्यायांसोबत मिळतील!
ज्या मॉडेल्समध्ये एएमडीचे प्रोसेसर आहेत त्यांमध्ये Radeon RX560 ग्राफिक्स कार्ड असेल तर Core i5, i7, i5+ व i7+ प्रोसेसर असलेल्या मॉडेल्समध्ये एनव्हिडियाचे GTX 1050 किंवा 1050Ti हे ग्राफिक्स कार्ड व इंटेल ऑप्टेन मेमरी असेल.
सर्व मॉडेल्समध्ये 15.6-inch full HD IPS डिस्प्ले असून यामध्ये ‘NitroSense’ नावाची तंत्र आहे जे कम्प्युटरकार्य करताना सर्व गोष्टींची अचूक माहिती देत राहिल. यामध्ये Dolby Audio Premium सोबत एसरची स्वतःची ‘TrueHarmony’ audio enhancing system असेल जी गेमर्सना गेम्स खेळताना उत्कृष्ट गुणवत्तेचा अनुभव देईल.
या नायट्रो ५ मालिकेतील लॅपटॉप्सची किंमत एएमडी प्रोसेसरसाठी ₹६५,९९९ पासून सुरू होते तर इंटेलसाठी ₹७२,९९९ हे लॅपटॉप सर्व ऑनलाइन व ऑफलाइन दुकानात उपलब्ध असतील.