आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर फार प्रसिद्ध ठिकाणीच जातो आणि तेथल्या इंटरनेटवर किंवा माहिती असलेल्या प्रसिद्ध वास्तु पाहून परत फिरतो मात्र गूगलच्या या नव्या अॅपद्वारे त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांकडून तेथील खास वैशिष्ट्यपूर्ण बारीकसारीक गोष्टींबद्दलसुद्धा माहिती मिळवता येईल. थेट प्रश्न विचारून उत्तरे सुद्धा मिळवता येतील!
प्रत्येक शहरातील अशी बारीकसारीक माहिती असलेल्यांना गूगलने नव माध्यम उपलब्ध करून देऊन सर्वांनाच मदत होईल असं हे Neighbourly अॅप बनवलं आहे! ज्यामुळे आता नव्या शहरामध्ये टिप्स, शॉर्टकट्स, खाण्याची ठिकाण अशी सर्व माहिती स्थानिक लोकांकडूनच मात्र अॅपद्वारे मिळवता येईल! तुम्ही स्वतः सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देऊन इतरांची मदत करू शकता. या अॅपची सुरुवात मुंबईपासून केली जात आहे. हे सध्या चाचणी स्वरूपात उपलब्ध करण्यात आलं आहे.
डाऊनलोड लिंक : Neighbourly on Google Play
Update : आता संपूर्ण भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात
नेबरली अॅपबद्दल व्हिडीओ : –
search terms travel cities google Neighbourly app for local helpers guides