IRCTC वेबसाईटमुळे झालेला त्रास बऱ्यापैकी सर्वांनाच अनुभवावा लागतो. अलीकडे यात बरीच सुधारणा झालेली असली तरी मूळ डिझाईन अजिबात बदललेलं नव्हतं मात्र आता संपूर्ण नव्या डिझाईनसह ही वेबसाईट उपलब्ध होत असून या संबंधी चाचणी सुरु झाली आहे आणि हि वेबसाईट वापरता सुद्धा येते.
नवी वेबसाइट पाहण्यासाठी लिंक : IRCTC
IRCTC वेबसाईट मधील नवे बदल :
- नवं डिझाईन ज्यामुळे बुकिंग करणं सोपं जाईल
- बुक करताना प्रत्येक प्रवाशाची माहिती वेगळी भरता येणार.
- लॉगिन न करता सुद्धा ट्रेन्सची उपलब्धता पाहता येणार!
- My Transactions, My Profile मध्ये यूजरना सोपे जाईल असे पर्याय
- वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवणे! (Wait List तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे याचा अंदाज वर्तवला जाईल. ही सुविधा इतर साइट्स द्यायच्या मात्र रेल्वे स्वतःच शक्यता सांगेल!)
search terms IRCTC new website 2018 design wait list probability confirmation prediction
ADVERTISEMENT