मायक्रोमॅक्स चीनी कंपन्यांच्या स्वस्त फोनच्या स्पर्धेत आता बरीच मागे पडली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वाधिक विक्री असलेली फोन कंपनी नोटबंदीनंतर बरेच महीने फोन सादर न केल्यामुळे बाजारात मागे जात गेली आहे. आता काही टेलीकॉम कंपन्यांशी भागीदारीत स्वस्त फोन्स सादर करत असून त्यामुळं त्यांना परत फोन बाजारात स्थान मिळेल का पाहावं लागेल… सध्या त्यांनी स्मार्टफोन सोबत टीव्ही, एसीनंतर आता फ्रीज आणि वॉशिंग मशीन्ससुद्धा सादर करण्याची घोषणा केलेली आहे!
भारत ५ प्रो हा फोन रेडमी ५ सोबत स्पर्धा करेल. मोठी बॅटरी याचा प्लस पॉईंट ठरेल. तरीही सध्याच्या फोन्ससमोर निभाव लागणं कठीणच आहे. ह्याच किंमतीत अधिक चांगल्या सोयींसह रेडमी ५ सारखे पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना अशा कमी सोयी सोयी असलेले फोन देऊन आपल्याकडं वळवणं शक्य होणार नाही
Micromax Bharat 5 Pro Fearures :
डिस्प्ले : 5.2″ HD
प्रोसेसर : 1.3GHz quad-core MediaTek
रॅम : 3GB
स्टोरेज : अंतर्गत 32GB सोबत microSD card द्वारे up to 64GB
मुख्य कॅमेरा : 13-megapixel
फ्रंट कॅमेरा : 5-megapixel सोबत 83.3-degree wide angle lens
किंमत : ₹७९९९