Vivo Apex Concept Phone |
विवो अपेक्स नावाचा हा फोन मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरतोय! इतका की या फोनबद्दल लोकांमध्ये सॅमसंगच्या गॅलक्सी एस ९ व एस ९+ याच्यापेक्षा जास्त उत्सुकता दिसून येत आहे!
यामध्ये फोनमधून वर येणारा फ्रंट कॅमेरा आहे. समोरची बाजू पूर्ण डिस्प्ले मध्येच असल्यामुळे कॅमेरा अशाप्रकारे बसवला आहे. यामध्ये सेन्सरसुद्धा आत लपवले असून यामध्ये चक्क निम्मा डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर म्हणून वापरता येतो! होय निम्म्या डिस्प्ले खाली फिंगरप्रिंट स्कॅनरचं तंत्र असल्यामुळे या भागात कुठेही तुमचं बोट सुरक्षेसाठी वापरता येतं! सध्याच्या फोन्सवर हे स्कॅनर गोल पुढे किंवा मागे असतो आणि तोसुद्धा तिथेच स्पर्श केल्यावर काम करतो. मात्र विवोच्या या नव्या फोनमध्ये सगळं काही बदलून टाकणाऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत! ह्या फोनच्या चाचण्या सुरू असल्यामुळे (कन्सेप्ट फोन) हा सध्या उपलब्ध झालेला नाही. विवो ओप्पो यांच्या फोन्सबद्दल सहसा मराठीटेकवर माहिती मिळत नाही कारण यामध्ये काही नावीन्य नसायचं मात्र विवोने फिंगरप्रिंट स्कॅनिंग व डिस्प्लेबाबत जे मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा जमलं नाही ते करून दाखवण्यास सुरुवात केली आहे!