मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्ध डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमच्या विंडोज १० ह्या आवृत्तीला आणखी एक अपडेट जाहीर करून काल ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यापुढेदेखील नवी ओएस आणण्याऐवजी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० लाच अपडेट देत राहण्याच ठरवलं आहे. Anniversary Update, Creators Update नंतर आता Fall Creators Update या नावाने हे नवं अपडेट आता डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
Windows 10 Fall Creators Update Download Link : Windows 10
• विंडोज मिक्स्ड रिऍलिटी : Windows Mixed Reality : गेम्स, ठिकाणे यांचा नवा आभासी अनुभव.
• फोटोज : फोटोज एडिट करण्यासाठी नवे पर्याय, फिल्टर्स,टेक्स्ट, साऊंड इफेक्ट, देऊन व्हिडीओसुद्धा बनवता येईल!
• पेंट 3D : पेंटमध्ये अनेक नवे पर्याय थ्रीडीमध्ये चित्रे रेखाटा, इफेक्ट द्या, टेक्स्ट लिहा!
• मिक्स्ड रिऍलिटी व्हयूअर : 3D ऑब्जेक्ट खऱ्या जगात असल्यासारख्या पाहता येतील!
• इमोजी कीबोर्ड : ‘Windows’+’.’ ही दोन बटणे एकदम दाबताच इमोजी कीबोर्ड उघडेल.
• कोर्टाना : आता कोर्टाना या असिस्टंटला बोलून पीसी बंद/रिस्टार्ट करता येईल!
• मायक्रोसॉफ्ट एज : मायक्रोसॉफ्टच्या या ब्राउजरमध्ये नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
• PDF/eBooks वर लिहण्याची/रेखाटण्याची सोय
• टास्कबारवर आवडीची वेबसाईट पिन करण्याची सोय
• सेक्युरिटी : रॅन्समवेयर सारख्या धोक्यांपासून विंडोज डिफेंडरद्वारे सुरक्षा वाढवली.
• कंटिन्यू ऑन पीसी : मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड व iOS साठी अॅप्स उपलब्ध करून दिली असून फोनवरील पाहत असलेली वेबसाईट लगेच पीसीवर उघडण्यासाठी ही नवी भन्नाट सोय देण्यात आली आहे!
• पीसी गेमिंग : गेमिंगसाठी सुद्धा काही बदल करण्यात आले असून गेम मोड, ब्रॉडकास्टसाठी मिक्सर, टास्क मॅनेजर मध्ये GPU बद्दल सुद्धा माहिती दिली जाईल!
व्हिडिओज : Cut Out Images Using Paint 3D
3D in Windows 10 Tutorials: Making Memories
Loved this windows 10 fall Creator update downloaded now. thanks for sharing this in Marathi