गोप्रो या अॅक्शन कॅमेरासाठी प्रसिद्ध असणार्या कंपनीने त्यांच्या हीरो मालिकेत नवा कॅमेरा सादर केला असून GoPro Hero 6 असं या मॉडेलचं नाव आहे. यासोबतचं गोप्रोने ३६० अंशात व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा असलेला गोप्रो फ्युजन कॅमेरासुद्धा आणला आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये हा कार्यक्रम पार पडला.
गोप्रो हिरो ६ (GoPro Hero 6) :
• 120 fps 2.7K रेजोल्यूशन आणि 1080p रेजोल्यूशनमध्ये 240 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग!
• 5GHz Wi-Fi फाइल ट्रान्सफरसाठी • सुधारित इमेज स्थिरता (डिजिटल)
• 12 मेगापिक्सल फोटो JPG किंवा RAW फॉरमॅटमध्ये, Wide Dynamic Range मोड
• कमी उजेडात Hero 5 पेक्षा चांगला व इतर वेळीही सुधारित गुणवत्ता!
• 33 फुटांपर्यंत वॉटरप्रूफ, GPS, 2-inch LCD टचस्क्रिन, आवाजाद्वारे बोलून नियंत्रण व काही एडिटिंग सुविधा यांचा आधीपासूनच समावेश.
• GP1 या नव्या प्रोसेसरचा समावेश जो खास गोप्रोसाठीच बनवलेला असून Socionext ही कंपनी गोप्रोसाठी प्रोसेसर बनवेल. यामुळे इमेज गुणवत्ता व एडिटिंग यावर गोप्रोचं अधिक नियंत्रण राहील.
• किंमत $499.99 (~₹ ३३०००) भारतात अॅमॅझॉनवर उपलब्ध http://amzn.to/2woF1Mx
गोप्रो फ्युजन (GoPro Fusion) :
• दोन लेन्सद्वारे 5.2K रेजोल्यूशन व 30 fps व्हिडिओ शूट करू शकतो
• 18 मेगापिक्सल Spherical फोटो
• 360 अंशात सर्व दिशांनी आवाज रेकॉर्ड करतो
• 16 फुटांपर्यंत वॉटरप्रूफ व सध्याच्या बऱ्यापैकी सर्व गोप्रो माऊंटला सपोर्ट
• GPS, वायफाय व ब्लूटूथ सोबत accelerometer, gyroscope आणि compass हे सेन्सर सुद्धा जे गोलाकार व्हिडीओला स्थिर करण्यास मदत करतात.
• आवाजाद्वारे बोलून नियंत्रण, गिम्बलशिवाय स्थिरता
• किंमत $699.99 (~₹४६०००)
गोप्रो कर्मा : यावेळी गोप्रो नवं ड्रोन सादर करण्याची शक्यता होती मात्र आहे त्याच ड्रोनला अपडेट देऊन Follow व Watch या दोन नव्या मोडसची जोड देण्यात आली आहे.
Just bought a GoPro Hero 6 Black from US. Thanks for the info.
Keep Sharing
Amazing web log and really fascinating stuff you bought here! I positively learned plenty from reading through a number of your earlier posts in addition and set to drop a discuss this one!
Article about GoPro Hero 6 in Marathi! Wow! Dhanyvad, Ashich mahiti det raha