बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने प्रिपेड ग्राहकांसाठी नवे इंटरनेट डेटा प्लॅन्स सादर केले असून सध्याच्या इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा खूपच स्वस्त आहेत!
१. Triple Ace प्लॅन नुसार 333 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना दर दिवशी 3GB 3G स्पीड इंटरनेट मिळेल. त्यावर 3GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद Unlimited डेटा वापर करता येईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी 3GB हायस्पीड डाटा असा एकूण 270GB हायस्पीड डेटा तोसुद्धा ९० दिवसांच्या वैधते(Validity)वर मिळणार आहे! म्हणजे ९० दिवस रोज 3GB इंटरनेट 3G स्पीडमध्ये! इंटरनेटचा भरपूर वापर करणार्याना या प्लॅनचा मोठाच फायदा होईल. या प्लॅन मध्ये व्हॉइस कॉलसाठी काही फायदे नाहीत.
२. दुसऱ्या प्लॅनमध्ये 339 रुपयांच्या रिचार्जवर BSNL ते BSNL अमर्याद व्हॉइस कॉलिंग, BSNL ते इतरांसाठी दरदिवशी २५ मिनिटे मोफत आणि यासोबत दरदिवशी 3GB डेटा (दरदिवशी 3GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद डेटा). मात्र या प्लॅनची वैधता २८ दिवसच आहे.
३. Dil Khol Ke Bol प्लॅन : तिसर्या ऑफरनुसार 349 रुपयांच्या रीचार्जवर अमर्याद Local + STD व्हॉइस कॉल्स सर्वच नेटवर्कवर सोबत 2GB मर्यादित डेटा 3G स्पीडमध्ये मिळेल. 2GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद. या प्लॅनची वैधता/Validity ९० दिवस असेल. हा प्लॅन व्हॉइस कॉल्स मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर उपयोगी आहे.
४. Nehle Pe Dahla प्लॅन : या प्लॅन नुसार 395 रुपयांच्या रिचार्जवर 2GB डेटा दर दिवशी मोफत मिळेल सोबत ३००० मिनिटे BSNLते BSNL च्या नेटवर्कवर मोफत आणि इतर नेटवर्कसाठी १८०० मिनिटे मोफत. मोफत कॉल्स संपल्यावर २०पैसे/मिनिट दराने कॉल्स. या प्लॅनची वैधता/Validity ७१ दिवस आहे.
एक सूचना : या वरील सर्व प्लॅन्सचा ऑनलाइन रिचार्ज (Paytm/FreeCharge) करणार असाल तर फोन क्रमांक टाकून झाल्यावर STV हाच पर्याय निवडा. (Topup निवडू नका).
हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.