दरवर्षी भरणारा टेक मेळा CES (Consumer Electronics Show) 2017 सुरू झालाय …..
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि त्यांचे विविध ब्रॅंडस हे आपापल्या प्रॉडक्टसची सादरीकरण करत असतात.
यावर्षी व्हीआर, ओलेड टीव्ही, वॉइस असिस्टंट नवे लॅपटॉप्स, कार्स, स्मार्ट डिवाइसेस यांची रेलचेल असणार आहे! अनेक कंपन्या आणि त्यांची यावर्षी व भविष्यातील वाटचाल या कार्यक्रमात दिसून येते… लास वेगस मध्ये सुरू असलेल्या या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड (सोनी, एलजी, सॅमसंग, Nvidia, लेनेवो, एचपी, डेल, पॅनासॉनिक, ZTE, इ.) यावर्षी कोणती उत्पादने घेऊन आले आहेत ते पाहूया ….
|
LG Signature W OLED TV |
LG : एलजी कंपनीने सादर केलाय केवळ 2.6mm जाडी असलेला टीव्ही !!!
ह्या टीव्हीची जाडी इतकी कमी आहे की हा टीव्ही नसून भिंतीवर चित्रच लावले आहे काय असा प्रश्न पडावा !
Nvidia (एनविडिया) या कंपनीने अँड्रॉइड टीव्हीचं नवं रूप शिल्ड टीव्ही सादर केलं आहे. याची किंमत $199 असून याद्वारे आपल्या टीव्हीमध्ये गेम्स खेळता येतात. एनविडिया स्पॉट नावाच्या माइक द्वारे गूगल असिस्टेंट घरात कुठेही वापरता येईल.
Samsung : सॅमसंग कंपनीने क्रोम ओएस वर आधारित क्रोमबुक्स सादर केल्या आहेत. यांची नावे क्रोमबुक प्रो आणि क्रोमबुक प्लस अशी आहेत.
दोन्ही मॉडेल्समध्ये नोट्स लिहिण्यासाठी स्टायलसची सोय आहे. डिस्प्ले 12.3-inch 2,400×1,600 सोबत गोरीला ग्लास आणि 32GB Internal storage व 4GB रॅम आहे. यांची किंमत $449 पासून सुरू आहे
Kingston : किंग्स्टन कंपनीने सादर केलाय तब्बल 2TB साइज असलेला पेनड्राइव !
DataTraveler Ultimate Generation Terabyte DTUGT या नावाने त्यांनी USB 3.1 तंत्र असलेले यूएसबी ड्राइव सादर केले आहेत. अंदाजे किंमत $900-$1000
Acer : एसर (Acer) या कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध गेमिंग लॅपटॉप मालिकेत नवं मॉडेल प्रिडेटर Predator 21 X सादर केलं आहे. याची स्क्रीन २१ इंची वक्राकार असून याच वजन ९ किलो आहे. याची किंमत $9000 (~₹६ लाख) प्रॉसेसर : Intel Core i7-7820HK processor
ग्राफिक्स कार्ड : Dual Nvidia GeForce GTX 1080 GPUs
रॅम : 64GB of DDR4 2400 MHz
डिस्प्ले : 2,560 x 1080 रेजोल्यूशन
याचा टचपॅड काढून उलट करून कीपॅडम्हणून वापरता येतो!
Asus : एसुसने सादर केला आहे नवा फोन Asus Zenfone AR
या फोनमधील सुविधा :
रॅम : 8GB, ओएस अँड्रॉइड 7.0 नुगट
डिस्प्ले : 5.7-inch SuperAMOLED QHD(1440×2560 pixels)
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 821 processor
कॅमेरा : 23-megapixel Sony IMX318 TriTech+ autofocus, dual-PDAF
फ्रंट कॅमेरा : 8-megapixel f/2.0 aperture
स्टोरेज : 256GB of inbuilt + expandable(up to 128GB)
बॅटरी : 3300mAh battery
इतर Type-C port, Bluetooth v4.2, Wi-Fi 802.11ac connectivity, प्रोजेक्ट Tango व Daydream VR -ready असलेला एकमेव फोन.
Meet the ZenFone AR : https://youtu.be/mDVbd-M0oA4
Sandisk : सॅनडिस्कने सादर केलं आहे तब्बल 256GB क्षमता असलेलं मेमरी कार्ड!
खास अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी तयार केलेलं हे कार्ड 95MB/s इतका ट्रान्सफर स्पीड देईल. हे कार्ड क्लास 10 UHS A1 असून याची किंमत $199 (₹ १३४००) आहे. A1 Certification असलेली कार्डस खास अँड्रॉइड फोन्ससाठी तयार केली जातात.
Panasonic : पॅनासॉनिकचा FZ80 मेगाझुम कॅमेरा सादर
तब्बल 60X ऑप्टिकल झूम, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, 18.1 मेगापिक्सेल MOS सेन्सर, सोबत वायफाय, टचस्क्रीनसुद्धा!
किंमत $400(~₹२८०००)
Windows VR : विंडोज १० वर आधारित व्हर्च्युअल रिअॅलिटीसाठी हेडसेट एचपी, एसर, डेल आणि लेनेवो यांच्याकडून सादर किंमत $300 (~₹२००००)
Xiaomi : शायोमी Mi 4 टीव्ही सादर
स्मार्टफोनपेक्षा कमी जाडी असलेला हा टीव्ही 65″, 55″,49″ या आकारात उपलब्ध होईल. (Xiaomi Mi TV 4)
याची किंमत साऊंड बार सोबत $2000 च्या आसपास असेल
साऊंड बार शिवाय $1500
Razer : रेझर या कंपनीने तीन स्क्रीन असलेल्या लॅपटॉपचं मॉडेल सादर केलंय
या लॅपटॉपमध्ये घडी घालून ठेवता येतील अशा तीन स्क्रीनचा समावेश आहे!
याच नाव Project Valerie असून बाजारात विक्रीसाठी सध्यातरी उपलब्ध होणार नाही. (Razer Project Valerie)हा केवळ प्रायोगिक तत्वावर बनवण्यात आला आहे. तिन्ही डिस्प्ले 17.3 इंची 4K रेजोल्यूशन म्हणजे एकूण (11520 x 2160)
Casio : कॅसिओने सादर केलं आहे त्यांचं नवं स्मार्टवॉच Casio WSD-F20
यामध्ये अँड्रॉइडची स्मार्टवॉचसाठीची ओएस वेयर 2.0 असून यामुळे यात ऑफलाइन मॅप डाऊनलोड करता येतात! First Smartwatch to have Android Wear 2.0
Honda : होंडा या कंपनीने सादर केली आहे स्वतःला बॅलन्स करणारी गाडी !
Uni-Cub mobility research चा यामध्ये वापर करण्यात आला आहे ज्यामुळे Gyroscope नसताना सुद्धा गाडी स्वतःला सावरत प्रवास करू शकते !
स्वतः चालणार्या चारचाकी गाड्यांनंतर आता दुचाकीसुद्धा त्याच पद्धतीने उपलब्ध होतील हे विशेष! हे होंडा असिस्ट तंत्र सध्या लगेच गाड्यांमध्ये बसवलं जाणार नसलं तरी याचा भविष्यात मोठा वापर होऊ शकतो!
Amazon : CES 2017 मध्ये सर्वात चर्चा झाली ती अलेक्सा या वॉइस असिस्टेंटची !
अॅमॅझॉन कंपनीने बनवलेला हा असिस्टेंट सध्या बर्याच पातळीवर सिरी, कोर्टाना, गूगल असिस्टेंट यांना मागे टाकत आहे. CES मध्ये सादर झालेल्या स्पीकर्स, टीव्ही, कार, फ्रीज, रोबो अशा जवळपास सर्वच डिवाइसवर अलेक्सा वापरता येत आहे! स्मार्ट होममध्ये सुद्धा अलेक्साचा बराच वापर होतोय जसे की घरातील दिवे/पंखे बंद चालू करण्यासाठी…!
Faraday Future : फॅरेडे फ्युचर या नवख्या कार कंपनीने सादर केली आहे इलेक्ट्रिक कार FF91
ह्या कारमध्ये नव्या तंत्राचा वापर करून बर्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक सेन्सर्स, १० कॅमेरे,१३ रडार बसवलेले असून हीसुद्धा एक स्वतः चालणारी(AutoDriving) विद्युत कार आहे! यामध्ये आरशाऐवजी कॅमेराचाच वापर केला आहे!
ही कार थेट टेस्लाच्या मॉडेल S P100D या कारपेक्षा वेगवान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या जगातील प्रॉडक्शन कारमध्ये टेस्ला मॉडेल एस सर्वात वेगवान असून 0-60 वेग पकडायला तिला 2.40 सेकंद लागतात. FF91 ला 2.39 लागतात असा दावा फॅरेडे फ्युचरने केला आहे.
मात्र सध्या कंपनी बद्दल काही प्रमाणात अडचणी दिसून येत असून डेमोवेळेस सुद्धा बर्याच फीचर्स चालू स्थितीत दिसत नाहीत! लवकरच यामध्ये सुधारणा करून बाजारात उपलब्ध करून दिली जाईल असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे
डेलने सादर केला आहे 8K रेजोल्यूशन असलेला मॉनिटर !
Dell : Dell UltraSharp UP3218K हा आहे जगातला पहिला 8K मॉनिटर
8K रेजोल्यूशन म्हणजे फुल एचडी FullHD च्या आठपट चांगलं रेजोल्यूशन !!!
डिस्प्ले 31.5-inch, 7680×4320 @ 60Hz, 280 ppi
कॉंट्रास्ट : 1,300:1 contrast ratio
जाडी : 9.7mm bezel
पोर्ट : 2 x DisplayPort 1.3, 4 x USB 3.0, audio line-out
किंमत : $4,999(~₹ 3,40,500)
एलजी कंपनीचा ओएलईडी बोगदा !
LG : एलजी कंपनीने सीईएस 2017 कार्यक्रमात चक्क २१६ ओलेड तेसुद्धा वक्राकार डिस्प्ले जोडून बोगदा तयार केला होता! हा बोगद्यासारखा दिसणारा प्रकार यापूर्वी IFA16 मध्ये प्रथम दाखवण्यात आला होता. !
सीईएसमधील खास फोटो व प्रोडक्टस पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाइक व ट्वीटरवर फॉलो करा!

Thanks for such very great information. This is the best sites for proving such kinds of good information.
Examhelpline.in
competition.examhelpline.in
law.examhelpline.in
mba.examhelpline.in
medical.examhelpline.in
school.examhelpline.in
engineering.examhelpline.in
careinfo.in
carebaba.com
I certainly agree to some points that you have discussed on this post. I appreciate that you have shared some reliable tips on this review.