गूगल कंपनीने असं जाहीर केलय की गूगल ही कंपनी आता त्यांच्याच नव्याने तयार केलेल्या अल्फाबेट या कंपनीचा भाग असेल म्हणजे अल्फाबेट ही गूगलची पालक कंपनी आहे आणि गूगल व इतर प्रॉडक्ट कंपनी अल्फाबेट अंतर्गत काम करतील. गूगलच्या ह्या मोठयाच उलट्फेरामुळे गूगलचे सर्व शेअर Alphabet Inc चे बनतील मात्र त्यांचे हक्क आणि संख्या तितकीच राहील.
गूगल संस्थापक लॅरी पेज यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटलय ” ह्या नव्या रचनेमुळे आम्हाला भविष्यातील गूगलकडे असलेल्या मोठ्या संधींवर लक्ष्य केन्द्रित करता येईल. Alphabet हे खरतर अनेक कंपन्याचा संच असून साहजिकच गूगल यामध्ये सर्वात मोठी भाग आहे. आम्ही 11 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे गूगल ही नेहमीच्या कंपन्यासारखी कंपनी नाही आणि तसे बनण्याची आमची इच्छा नाही. “
ADVERTISEMENT
नव्या रचनेनुसार गूगल कंपनीचं सीईओ पद भारतीय “सुंदर पिचाई” यांच्याकडे जाईल!
या नव्या सीईओ नियुक्तीबाबत बोलताना पेज म्हणाले, सुंदर हा गूगलल पुढे नेण्यात महत्वाचा हिस्सा आहे. त्याचे विचार काही वेळा माझ्यापेक्षासुद्धा चांगले ठरतात.
लॅरी पेज हे Alphabet चे सीईओ होतील. Alphabet ची स्वतंत्र साइट दीखील सादर करण्यात आली असून तिचा अॅड्रेस असा आहे : abc.xyz
सुंदर पिचाई (गूगल सीईओ) |
सुंदर पिचाई (नवे गूगल सीईओ) बद्दल :
- गूगल सीईओ बनण्यापूर्वी सुंदर क्रोम आणि अँड्रॉइडचे प्रमुख सुद्धा होते. सध्या ते गूगलचे सीनियर वाइस प्रेसिडेंट होते.
- सुंदर यांचा जन्म चेन्नई मधला असून ते आयआयटी खरगपूरचे B.Tech विद्यार्थी होते
- त्यानंतर त्यांनी Stanford मधून MS पदवी मिळवून Wharton School मधून एमबीए पदवी घेतली
- २००४ मध्ये पिचाई यांनी गूगल जॉइन केली आणि तेव्हापासून त्यांनी अनेक प्रॉडक्टवर काम करत नवनवी पदं मिळवत आज थेट सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे!
- २००८ मध्ये क्रोम २०१२ मध्ये अँड्रॉइड आणि २०१५ मध्ये पूर्ण कंपनी प्रमुख असा त्यांचा प्रवास
- मितभाषी, शांत स्वभाव, लॅरी पेज यांचे चांगले सहकारी अशी त्यांची ओळख
- सीईओ पदाची घोषणा झाल्यापासून अनेक मान्यवरांकडून अभिनंदन (नरेंद्र मोदी, सत्या नाडेला, एरिक श्मिट, टिम कुक, चंद्राबाबू नायडू , निकेश अरोरा, इ. )