एक वर्षापूर्वी OnePlus One हा कॉंट्रॅक्ट नसलेला सर्वात मस्त फोन होता. अनेक ग्राहकांना आकर्षित करण्यात OnePlus पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली होती. या चीनी कंपनीने रु. २०,००० भन्नाट फीचर्स दिली होती आणि विक्रीचे देखील नवे उच्चांक गाठले.
आता याच कंपनीने यावर्षीचा फोन One Plus Two या नावाने सादर केलाय! आणि याची किंमत देखील स्पर्धात्मक असून रु. २२,९९९ (१६जीबी) आणि २४,९९९ (६४जीबी) अशी आहे. हा फोन सादर करताना यांनी गूगल कार्डबोर्डवरून इवेंट पाहता येण्याची सोय केली होती. त्यासाठी त्यांनी चक्क स्वतः कार्डबोर्डदेखील विक्रीस आणले होते तेही केवळ ९९ रुपयात ! सोशल मीडियावर देखील या फोनबद्दल प्रचंड उत्सुकता होती. #Hype, #FlagshipKiller असे ट्रेंड हल्ली सारखे दिसायला मिळत होते.
फीचर्स :
- स्क्रीन : ५.५” FullHD IPS
- ऑपरेटिंग सिस्टम : OxygenOS(अँड्रॉइड लॉलीपॉप ५.१)
- कॅमेरा : १३ MP + ५ MP Omnivision लेसर
- बॅटरी : ३३०० mAh
- प्रॉसेसर : 64-bit Qualcomm Snapdragon 810 (जगातल्या सर्वात फास्ट प्रॉसेसर पैकी एक)
- यूएसबी : USB टाइप C पोर्ट (दोन्ही बाजूने चालतो)
- ड्युल सिमची सोय
- फिंगरप्रिंट सेन्सर : unlock करताना सेक्युर्टीसाठी तुमच्या बोटाच्या ठशाचा उपयोग!
हा फोन Amazon वर उपलब्ध होणार असून ११ ऑगस्ट पासून invitation असलेल्यांनाच हा फोन घेता येईल. 16GB मोडेल नंतर विक्रीस आणलं जाईल असं सांगण्यात आलय.
मात्र काही ग्राहक काही फीचर्स नसल्यामुळे नाराज आहेत. तसेच ह्या फोनबद्दल प्रमाणापेक्षा जास्त चर्चा झाली अससुद्धा बर्याच जणांच म्हणणं आहे. Flagship Killer of 2016 अशी जाहिरात करण्यात आली होती. (Flagship म्हणजे त्या-त्या कंपनीचं बेस्ट प्रॉडक्ट)
नसलेले फीचर्स :
- NFC नाही
- वायरलेस चार्जिंग नाही
- फास्ट चार्ज नाही
तरीदेखील ह्या फोनने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या असं OnePlus च्या चाहत्यांच मत आहे. निश्चितच हा फोन 2016 चा flagship किलर ठरणार नाही पण हा फोन स्वतः नक्कीच एक चांगला स्मार्टफोन आहे!
ADVERTISEMENT