मोटोरोलाने त्यांच्या मोटो जी सिरीज मधला तिसरा फोन आज भारतीय बाजारपेठेत सादर केलाय. आधीच प्रचंड स्पर्धा असलेल्या ह्या भागात आणखी एकाची भर पडली आहे. भारत हा मोटो जी साठी प्रथम ग्राहक ठरणार आहे.
नवं मॉडेल 2 प्रकारात येणार असून 8GB व्हर्जनची किंमत रु. ११,९९९ तर १६GB व्हर्जनची किंमत र. १२,९९९ आहे.
फीचर्स :
- स्क्रीन : ५” HD डिस्प्ले गोरीला ग्लास ३ सोबत
- रॅम : २ जीबी
- कॅमेरा : १३ MP + ५ MP ड्युल एलईडी फ्लॅश
- बॅटरी : 2470mAh
- वॉटरप्रूफ ! (३०मिनिट व १ मीटर खोल पाण्याखाली राहू शकेल)
- नेटवर्क : ड्युल सिम ४जी नेटवर्क
- ओएस : अँड्रॉइड ५.१
- कलर : पांढरा आणि काळा
हा फोन फ्लिपकार्टवर २९ जुलै पासून उपलब्ध होईल.
Moto X Style (Source : Engadget) |
मोटो X स्टाइल हा नवा फोन देखील मोटोरोलाने सादर केलाय. हा फोन अँड्रॉइड असलेल्या फोन्सपैकी बेस्ट फोन असू शकेल. ह्यामध्ये जगातील सर्व फोन्समध्ये सर्वात चांगला कॅमेरा असल्याचा दावा करण्यात आला आहे. ह्या फोन सोबत मोटो मेकर उपलब्ध आहे ज्याद्वारे यूजर त्याला हवा तसा फोन कलर निवडून बदल करून ऑर्डर देता येते. फोनसाठी भरपूर बॅकपॅनल घेता येतात.
फीचर्स :
- स्क्रीन : ५.७” QuadHD डिस्प्ले
- रॅम : ३ जीबी
- कॅमेरा : २१ MP
- बॅटरी : ३००० mAh
- नेटवर्क : 4G
- स्टोरेज : ६४ जीबी
- किंमत : $399
ह्या फोनची स्क्रीन, कॅमेरा, दमदार फीचर्स नक्कीच अँड्रॉइडप्रेमींना भुरळ पाडणार.
ADVERTISEMENT