internet.org ही वेबसाइट फेसबूकतर्फे सादर करण्यात आली असून सध्या केवळ रिलायन्स नेटवर्कच्या वापरकर्त्यांना एका अँड्रॉईड अॅपद्वारे किंवा internet.org या वेबसाइटवरूनदेखील 37 प्रसिद्ध वेबसाइट मोफत/फ्री अॅक्सेस करता येईल. ह्या सर्विस 2G व 3G अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येणार असून यासाठी कोणत्याही एका डाटा इंटरनेट पॅक अॅक्टिवेट केलेला असावा लागेल. ह्या सर्विस शिक्षण, नोकरी, आरोग्य, न्यूज, सर्च, खेळ, यूटिलिटि, सोशल अशा प्रकारच्या वेबसाइट मोफत वापरता येतील.
इंटरनेट.ओर्ग ही फेसबूक आणि इतर सहा कंपनी (सॅमसंग, एरिक्सन, मीडियाटेक, मायक्रोसॉफ्ट, ओपेरा आणि qualcomm) यांनी सुरू केलेला उपक्रम आहे. ज्याचा उद्देश सर्वांना अल्प दरात इंटरनेट उपलब्ध करू देण्याचा आहे. गूगलने देखील प्रोजेक्ट लून नावाचा उपक्रम याच उद्देशाने सुरू केलाय. तो देखील काही महिन्यात भारतात उपलब्ध होईल.
मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रा, चेन्नई, तमिळनाडू आणि केरळ या राज्यातील रिलायन्स यूजर आजपासून या सुविधेचा फायदा घेता येईल. काही कालावधीत हे सर्कल वाढवण्यात येईल. काही दिवसात आणखी site मोफत देण्याचा विचार सुरू असल्याचे रिलायन्सतर्फे सांगण्यात आले आहे.
इंटरनेट.ओर्ग वर फ्री अॅक्सेस असलेल्या वेबसाइटची यादी ::
- Careers and jobs : TimesJobs, Babajob
- Education and Knowledge : Wikipedia, wikiHow, Dictionary.com, Translator, Reuters Market Lite, Jagran Josh
- Health and Social Welfare : Facts for Life, (UNICEF), BabyCenter and MAMA, Girl Effect (Nike Foundation), iLearn (UN Women), Malaria No More, Socialblood, AP Speaks
- News: BBC News, Times of India, India Today, NDTV, BBC News, IBNLive, Aaj Tak, Amarujala.com, Daily Bhaskar, Maalai Malar, Maharashtra Times, Jagran, Newshunt, Manoramanews.com
- Search : Bing (from Microsoft)
- Social : Facebook, Facebook Messenger
- Sports : ESPN Cricinfo
- Utility : OLX, Astro, Cleartrip, AccuWeather
वरील अनेक वेबसाइट मराठी हिन्दी मल्याळम तेलुगू गुजराती व इतर भाषेत सुद्धा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
ADVERTISEMENT