संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ आपली सगळ्यात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम ‘WINDOWS XP’चा टेक्निकल सपोर्ट आजपासून (मंगळवार) बंद करणार आहे. त्यामुळे जगभरात सर्वाधिक काळ अस्तित्त्वात असणारी ‘WINDOWS XP’ उद्या अर्थात बुधवारपासून कालबाह्य होणार आहे.
‘WINDOWS XP’चा जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. मात्र, ग्राहकांना आजपासून सिक्युरिटी अपडेट, ऑनलाईन टेक्निकल कंटेंट अपडेट मिळू शकणार नाही. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका देशातील बॅंकिंग क्षेत्राला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशभरातील बहुतेक बॅंकाचे एटीएम अजूनही ‘WINDOWS XP’ या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु आहेत. त्यामुळे याचा फटका बँकांना सर्वाधिक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, फक्त जुन्या एटीएमवर याचा परिणाम होईल, नव्या एटीएमला त्याचा फटका बसणार नाही, असे इंडियन बँक्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.
भारतात कंपन्यांमधील सुमारे 40 लाख कॉम्प्युटरमध्ये ‘WINDOWS XP’ ऑपरेटिंग सिस्टम आहे. मात्र, त्यामधील 84 टक्के कंपन्या नवी ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत. हा टेक्निकल सपोर्ट बंद केल्याने ‘WINDOWS XP’ वापरली तर यामुळे सायबर क्राईमची भीती वाढेल, तसेच नवे हार्डवेअर सिस्टमला सपोर्ट करणार नसल्याचेही ‘मायक्रोसॉफ्ट’चे संचालक टिम रेन्स यांनी स्पष्ट केले आहे.
‘मायक्रोसॉफ्ट’ने ऑक्टोबर 2001मध्ये ‘WINDOWS XP’ही ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली होती. सध्या ती ‘’WINDOWS XP SERVICE PACK 3’ या नावाने ओळखली जाते.
2001 मध्ये मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली ‘WINDOWS XP’ ही ऑपरेटींग सिस्टम बंद करणार आहे. या सिस्टमचा वापर आजही देशातील बॅंका आणि कंपन्यांमध्ये केला जात आहे. ‘WINDOWS XP’ मध्ये अपडेट बंद झाल्यानंतर बॅंकांच्या एटीएममध्ये व्हायरस अटॅक होण्याची शक्यता आहे. हॅकर्स या सिस्टमवर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकतात.
‘विंडोज 7’, ‘विडोंज 8’ आणि ‘विंडोज विस्टा’च्या सेक्युरिटी अपडेटचा वापर करून ‘WINDOWS XP’वर अटॅक होण्याची 100 टक्के शक्यता जास्त असल्याचे मायक्रोसॉफ्टचे संचालक टिमोशी रेन्स यांनी सॅन फ्रॅसिस्कोमध्ये कॉम्प्युटर सेक्युरिटीबाबत एका परिषदेत सांगितले होते.
WINDOWS XP सपोर्ट बंद झाल्यामुळे भारतातील बहुतेक बॅंकांच्या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली अराहे. बिझनेस स्टॅडर्डद्वारा जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, भारतातील जवळपास 40 ते 70 टक्के बॅंकाचे एटीएम हे XP च्या प्लॅटफॉर्मवर काम करते. WINDOWS XP सपोर्ट बंद झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टतर्फे टेक्नीकल सपोर्ट बंद होइल. त्यामुळे एटीएम हॅक होणे, वारंवार हॅंग होणे तसेच बंद पडणे या सारख्या समस्या वाढतील.
आपली ऑपरेटिंग सॉफ्टवेअरला ‘विंडोज एक्सपी’वरून ‘विंडोज 7’मध्ये अपग्रेड करण्यासाठी इंस्टॉलेशनदरम्यान, Custom पर्यायावर क्लिक करा. कस्टम इंस्टॉलेशन हे साधारण इंस्टॉलेशनच्या तुलनेत कठिन असते. त्यामुळे या प्रक्रियेला अनेक तास लागू शकतात.