ठाण्यात मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचा फिवर आता कमी झाला आहे. मतदान होईपर्यंत आयपीएलच्या मॅचेसकडे सगळ्यांचं काहीसं दुर्लक्ष होत होतं. पण आता १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागणार असल्याने राजकारण जरा बाजूला पडेल. तोवर चर्चा रंगेल ती आयपीएलची. क्रिकेटफॅन्सना अपडेट ठेवण्यासाठी अनेक अॅप्स मार्केटमध्ये आले असून त्यांचं डाऊनलोडिंग वाढताना दिसेल.
गेल्या काही दिवसांत निवडणुकांशी संबंधित पोस्ट, मेसेजेस, अॅप्लिकेशन्सची मार्केटमध्ये चर्चा होती. पण आता नाक्या-नाक्यावर चर्चा रंगेल क्रिकेटचीच. स्मार्टफोनच्या दुनियेत सगळं काही फोनवरुन जाणून घेतलं जाते. हातातल्या मोबाइल फोनवर क्रिकेटमॅचचा स्कोअर बघण्यापासून मॅचचे हायलाइट्स बघण्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल तो विविध अॅप्सच्या माध्यमातून. यासाठी मार्केटमध्ये नवनवीन क्रिकेट अॅप्स आले आहेत. तुम्ही फक्त हे अॅप्लिकशन आपल्या स्मार्ट मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केलं की सबकुछ तुमच्या मुठ्ठीमध्ये असेल. अशाच काही अॅप्सविषयी…
आयपीएल: आयपीएल क्रिकेटचं हे एक अधिकृत अॅप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला लाइव्ह स्कोअर समजतो. तसंच तुम्हाला व्हिडीओ हायलाइट्स, डिटेल शेड्यूल, खेळाडूंची संपूर्ण माहिती मिळते.
क्रिकइन्फो: हे अॅप्लिकशन तुम्हाला क्रिकेटसंबंधित सर्व माहिती पुरवतं. त्याव्यतिरिक्त तुम्हाला ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स मिळतात आणि मॅचची माहिती, त्याबद्दलचे नोटिफिकेशन्स आणि अॅलर्टस मिळतात.
अधिकृत डीटीएच अॅप्लिकेशन अॅप: हे अॅप लाइव्ह टीव्ही अॅप्लिकेशन अर्थात डिजीटल टीव्हीवरच वापरू शकतो. यासाठी आपल्याला महिन्याभराचे पैसे द्यावे लागतात किंवा हे अॅप तुम्ही चालू केबल कनेक्शनसोबतसुद्धा जोडू शकता.
नेक्स्ट जनरेशन टीव्ही: या अॅपमुळे तुम्ही तुमच्या फोनच्या डेटा कनेक्शनवर लाइव्ह टीव्ही पाहू शकता. तसंच हे अॅप तुम्हाला अॅड्जस्ट पिक्चर क्वालिटीसारख्या सुविधाही देतो. तसंच क्रिकेटप्रेमींसाठी स्मार्ट टीव्ही, एक्स्ट्रा लार्ज स्क्रीन टीव्ही, कर्व्ह टीव्ही असे काही टीव्हीचे मॉडेल्सही मार्केटमध्ये आले आहेत. त्यावर क्रिकेट मॅच बघणं हा एक मस्त अनुभव ठरू शकेल.

ADVERTISEMENT